Ind vs Nz 1st Test : विराटच्या होम ग्राउंडवर रोहित सेनाचा मोठा पराभव, न्यूझीलंडने रचला इतिहास, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेली आहे.
India vs New Zealand 1st Test : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 8 गडी राखून जिंकला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह न्यूझीलंडचा 36 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला. न्यूझीलंडने 1988 नंतर प्रथमच भारतात विजय मिळवला. किवी संघाने तिसऱ्यांदा भारतात कसोटी सामना जिंकला. टॉम लॅथमची कायमस्वरूपी कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने आश्चर्यकारक कामगिरी केली.
New Zealand win the First Test by 8 wickets in Bengaluru.#TeamIndia will look to bounce back in the Second Test.
— BCCI (@BCCI) October 20, 2024
Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @idfcfirstbank pic.twitter.com/6Xg4gYo8It
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला, पण 46 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या होत्या. एकूण पाच खेळाडूं शून्यावर आऊट झाला. त्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 180 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये डेव्हन कॉनवेच्या 91 धावांच्या शानदार खेळीचा समावेश होता.
रचिन रवींद्रचे शतक
तिसऱ्या दिवशी रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले. रवींद्रने 157 चेंडूत 134 धावांची खेळी खेळली आणि तो शेवटपर्यंत टिकून राहिला. आपल्या खेळीत त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले. रचिन व्यतिरिक्त टीम साऊदीने आपल्या संघासाठी एकूण 65 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात एकूण 402 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने 3-3 बळी घेतले.
सरफराज-पंतचा
त्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला शानदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले आणि 52 धावा करून बाद झाला. तर जैस्वालने 35 धावा केल्या. यानंतर विराट काहलीनेही अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या 231 पर्यंत नेली. चौथ्या दिवशी सरफराज खानने भारतासाठी 150 धावांची शानदार खेळी केली. तर पंत 99 धावांवर बाद झाला. भारताने दुसऱ्या डावात एकूण 462 धावा केल्या. त्यामुळे भारताला न्यूझीलंडविरुद्ध केवळ 106 धावांची आघाडी घेता आली.
107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पाचव्या दिवशी 0 धावांनी डावाला सुरुवात केली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम काही विशेष करू शकले नाहीत आणि ते अनुक्रमे 17 आणि 0 धावांवर बाद झाले. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.