एक्स्प्लोर

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स चार जणांना रिटेन करणार, रोहित शर्माबाबत काय ठरलं? लखनौचं केएल राहुल बाबत तळ्यात मळ्यात 

Rohit Sharma : आयपीएलच्या पुढील वर्षातील हंगामासाठी मेगा ऑक्शन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. त्यापूर्वी संघांना रिटेन करत असलेल्या खेळाडूंची यादी तयार करावी लागणार आहे. 

मुंबई: मुंबई इंडियन्सकडून पुढील आयपीएलसाठी रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं लवकरच निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.  मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांना रिटेन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटसकडून अद्याप के एल राहुल संदर्भात अंतिम निर्णय घेतला गेल नसल्याची माहिती आहे. लखनौची कामगिरी देखील 2024 च्या आयपीएलमध्ये समाधानकारक झाली नव्हती.  

मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं होतं. मात्र, मुंबईला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला रिटेन केल्यास 120 कोटींपैकी 61 कोटी रुपये खर्च होतील. इशान किशनला ऑक्शनमधून संघात स्थान दिलं जाईल. तर, टीम डेविडसाठी आरटीएमचा पर्याय वापरला जाऊ शकतो अशी माहिती आहे, यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. 

राजस्थान रॉयल्स कॅप्टन संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि रियान परागला रिटेन करण्याची शक्यता आहे. तर राजस्थानची जोस बटलरसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे. 

लखनौ सुपर जाएंटसचा केएल राहुल बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ते आयुष बदोनी, वेगवान गोलंदाज मोहसीन खान, निकोलस पूरनला रिटेन करण्याची शक्यता आहे. 

दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव या तिघांना रिटेन करण्याची शक्यता आहे.      

पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगला रिटेन केलं जाईल. याशिवाय शशांक सिंग आणि आषुतोष शर्माला देखील रिटेन केलं जाण्याची शक्यता आहे. 

आयपीएलच्या 2025 मधील हंगामासाठी सर्व संघांना रिटेन करत असलेल्या खेळाडूंची यादी तयार करायची आहे. पुढील महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे, त्यापूर्वी रिटेन करत असलेल्या खेळाडूंची यादी जमा करावी लागणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना यादी सोपवावी लागेल. एखाद्या संघाला सहा खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त पाच कॅप्ड खेळाडू रिटेन करता येतील. चार कॅप्ड खेळाडू आणि दोन अनकॅप्ड खेळाडू देखील रिटेन करता येतील.   

आयपीएलच्या रिटेन्शनच्या नियमानुसार पहिल्या खेळाडूसाठी फ्रँचायजी 18 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 14 कोटी, तिसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटींपर्यंत खर्च करु शकते. चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी देखील ही मर्यादा 18 आणि 14 कोटी असेल. फ्रँचायजी राईट टू मॅच हा पर्याय देखील वापरू शकते. मात्र, त्यांनी केवळ 5 खेळाडूंना रिटेन केल्यास तो पर्याय वापरता येईल. अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची मर्यादा 4 कोटी रुपयांपर्यंत असेल. 

इतर बातम्या :

IND vs NZ 1st Test Day-2 Weather Update : बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवशीही इंद्रदेवचा मूड खराब? नाणेफेक होणार का? जाणून घ्या हवामान रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Embed widget