हार्दिक अहमदाबादचा कर्णधार झाल्यानंतर मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया
Hardik Pandya Ahmedabad Captain : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये मोठी लॉटरी लागली आहे.
Hardik Pandya Ahmedabad Captain : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये मोठी लॉटरी लागली आहे. अहमदाबाद संघाने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई संघाचा भाग होता, पण लिलावाआधी मुंबईने हार्दिक पांड्याला रिलिज केलं होतं. लिलावात पोहचण्याआधी अहमदाबाद संघाने हार्दिक पांड्याला खरेदी केलं. अहमदाबाद आणि लखनौ हे दोन संघ यंदा आयपीएलमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे आता आयपीएलमध्ये दहा संघ दिसणार आहेत.
अहमदाबाद संघाने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये हार्दिकचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तसेच 'कुंफू पांड्या, तुला खूप शुभेच्छा! लवकरच मैदानावर भेट होईल', असा खास संदेश देण्यात आला. आयपीएलच्या पुढील हंगामाआधी मुंबईने हार्दिक पांड्याला मुंबईने करारमुक्त केलं होतं. पण मेगा लिलावात हार्दिकला मुंबईचा संघ परत विकत घेईल असं बोललं जात होतं. पण अहमदाबाद संघाने त्याआधीच बाजी मारली आहे. त्यामुळे आता हार्दिक मुंबईकडून खेळणार नाही हे नक्की झालं आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला सर्वात आधी दहा लाख रुपयांत खरेदी करण्यात आले होतं, त्यानंतर आता हार्दिक पांड्याला तब्बल 15 कोटी रुपये मोजले आहेत.
View this post on Instagram
अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी 15 - 15 कोटी रुपये दिले आहेत. तर शुबमन गिल याला आठ कोटी रुपयात करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे.