(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL 2023 : वूमेन्स प्रीमियर लीग तरुणींना प्रेरणा देईल, त्यांची स्वप्न सत्यात उतरवेल: नीता अंबानी
WPL 2023: वूमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) 4 मार्चपासून सुरू झाली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली.
WPL 2023: वूमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) 4 मार्चपासून सुरू झाली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (mumbai indians women team) गुजरात जायंट्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली. या ओपनिंग सामन्यात संघाच्या मालकीण नीता मुकेश अंबानी (Nita Ambani) देखील उपस्थित होत्या. 4 मार्च रोजी डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सीजनच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. प्रथमच सुरु झालेली वूमेन्स प्रिमिअर लीग ही देशातील तरुणींना प्रेरणा देईल, त्यांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मदत करेल अशी आशा नीता अंबानी यानी व्यक्त केली.
डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि पुरुष दोघेही महिला क्रिकेटला सपोर्ट करताना दिसले. यासोबतच मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानीही प्रत्येक चेंडूवर आपल्या टीमला चिअर करत होत्या. अधिकाधिक महिला या खेळाकडे आकर्षित व्हाव्यात, हा त्यांचा उद्देश आहे. हा सामना संपल्यानंतर नीती अंबानी मुंबई इंडियन्सच्या गेम ड्रेसिंग रूममध्ये एका समारंभात सहभागी झाल्या होत्या. सामन्यानंतर एका मुलाखतीत नीता अंबानी (Nita Ambani) म्हणाल्या, 'डब्ल्यूपीएलचा पहिला दिवस हा अविस्मरणीय होता. खेळातील महिलांसाठी हा एक प्रतिष्ठित दिवस आणि एक प्रतिष्ठित क्षण आहे. डब्ल्यूपीएलचा भाग बनणे खूप रोमांचक आहे.''
'डब्ल्यूपीएलमुळे महिलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास मदत होणार'
नीता अंबानी (Nita Ambani) यांनी डब्ल्यूपीएलमुळे अधिकाधिक महिलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली. त्या म्हणाल्या आहेत की, "मला आशा आहे की यामुळे देशभरातील तरुण मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्यास प्रेरित करेल.''
नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आपल्या संघाचे कौतुक करताना सांगितले की, मुंबई इंडियन्सकडे (mumbai indians women team) चांगली जर्सी आहे आणि त्यांचा पहिला सामना अनुभवी तसेच तरुण खेळाडूंसाठी चांगला होता. त्या म्हणाल्या की, मुंबई इंडियन्स हे निर्भय आणि रोमांचक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. आज आमच्या मुली खूप चांगलं खेळल्या. त्या ज्या पद्धतीने खेळला त्याचा मला खूप अभिमान आहे. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार हरमनचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, तिने खेळलेली खेळी खूप खास आहे. अमेलिया केर ही जबरदस्त असून तिने चांगली फलंदाजी केली आणि चांगली गोलंदाजीही केली. नीता अंबानी (Nita Ambani) पुढे म्हणाल्या की, “स्टेडियममध्ये इतक्या लोकांना पाहून खूप आनंद झाला. महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी पुरुष आणि महिला दोघेही मोठ्या संख्येने बाहेर पडले. या उद्घाटन स्पर्धेसाठी मी सर्व संघांना शुभेच्छा देते.”