IND Vs ENG Test : लीड्स टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडनं 'जंटलमन्स गेम'चे वाजवले बारा; मोहम्मद सिराज संतापला, इंग्लिश खेळाडूशी शाब्दिक चकमक, पाहा Video
IND Vs ENG 1st Test News : लीड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर इंग्लंडच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.

England vs India 1st Test Day 5 : लीड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर इंग्लंडच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. लंचपर्यंत त्यांनी एकही गडी न गमावता 117 धावा फलकावर लावल्या आणि भारतीय गोलंदाजांसमोर मोठं आव्हान उभं केलं. मात्र, लंचपूर्वीचं शेवटचं षटक काहीसं वादग्रस्त ठरलं. मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे मैदानावरील वातावरण तापलं. ही केवळ खेळातील रणनीती नव्हती, तर दोन्ही संघांमधील तणाव उफाळून आला होता.
जॅक क्रॉलीने केले असे कृत्य...
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी शानदार फलंदाजी केली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यासारख्या वेगवान गोलंदाजांना या सत्रात एकही विकेट मिळवता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा जोरदार सामना केलाच नाही तर धावगतीही राखली. पण या शांत आणि एकतर्फी सत्रात शेवटच्या षटकात गोंधळ उडाला.
The intensity is sky-high as #TeamIndia’s bowlers are leaving it all out on the field!
— Star Sports (@StarSportsIndia) June 24, 2025
Could this be the moment that sparks a wicket spree from @mdsirajofficial https://t.co/0K41uhrKJ5 pic.twitter.com/BtNs0CXpTQ
खरं तर, लंचच्या अगदी आधी मोहम्मद सिराज शेवटचे षटक टाकत होते. भारतीय संघाची रणनीती अशी होती की लंच टाइमपूर्वी आणखी एक षटक टाकावे, जेणेकरून इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव येईल. सिराजने हे षटक लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी रन-अपवर वेगाने धावला आणि शेवटचा चेंडू टाकला. त्यानंतर फलंदाजी करत असलेला जॅक क्रॉली जाणूनबुजून क्रीजपासून लांब गेला. प्रत्यक्षात त्याने वेळ पूर्ण करण्यासाठी असे केले जेणेकरून भारताला आणखी एक षटक टाकता येऊ नये. तो असे करण्यात यशस्वीही झाला आणि टीम इंडियाला आणखी एक षटक टाकता आले नाही.
टीम इंडियाचे खेळाडू संतापले
या घटनेमुळे भारतीय ताफ्यात नाराजी निर्माण झाली. आक्रमकता आणि जोशासाठी ओळखला जाणारा सिराज या कृत्यावर खूप नाराज दिसत होता. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इतर खेळाडूंनीही क्रॉलीच्या या हालचालीवर नाराजी व्यक्त केली. काही क्षणांसाठी मैदानावर तणावाचे वातावरण होते, ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला. पण, हे कोणत्याही नियमाविरुद्ध नव्हते. अनेक वेळा खेळाडू रणनीतीनुसार असे करतात. परंतु सोशल मीडियावर भारतीय चाहते या घटनेची टीका करत आहेत आणि इंग्लंडच्या फलंदाजावर बेईमानी केल्याचा आरोप करत आहेत.
















