एक्स्प्लोर

BCCI Awards: गिल, शामी, अश्विन अन् बुमराह ठरले सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, BCCI कडून पुरस्काराचे वितरण 

Best International Cricketer Award : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीयकडून (BCCI) मंगळवारी विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चार वर्षानंतर बीसीसीआयकडून या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेय.

Best International Cricketer Award : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीयकडून (BCCI) मंगळवारी विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चार वर्षानंतर बीसीसीआयकडून या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेय. याआधी 2019 मध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हैदराबादमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 2019-20 पासून 2022-23 पर्यंत सर्वोत्कृष्ट खेळणाऱ्या खेळाडूंना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रवि शास्त्री (Ravi Shastri) आणि फारुख इंजिनियर (Farokh Engineer) यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने (c k naidu award) सन्मानित करण्यात आले.  सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, मोहम्मद शामी आणि आर. अश्विन यांना सन्मानित करण्यात आले. चारही खेळाडूंना पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवण्यात आले. महिला विभागात दिप्ती शर्मा आणि स्मृती मंधाना यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला 'पॉली उमरीगर अवॉर्ड' 2019-20 साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला. त्याशिवाय 2020-21 साठी आर. अश्विन,  2021-22 साठी जसप्रीत बुमराह आणि 2022-23 साठी शुभमन गिल याला पुरस्कार मिळाला. 

कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार, पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू , सर्वोत्कृष्ट पदार्पण, दिलीप सरदेसाई पुरस्कार आणि इतर पुरस्काराने महिला आणि पुरुष संघातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही पुरस्काराने गौरवण्यात आले. बीसीसीआयकडून पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचं कौतुक करण्यात आले. 

 कोणत्या दिग्गजांना कोणते पुरस्कार प्रदान करण्यात आले ? 

कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार - रवि शास्त्री, फारुख इंजिनियर 

पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : शुभमन गिल (2022-23),जसप्रीत बुमराह (2021-22), रविचंद्रन अश्विन (2020-21), मोहम्मद शमी (2019-20)  

महिला - दिप्ती शर्मा (2019-20), (2022-23) स्मृती मंधाना (2020-21), (2021-22)

सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)- मयांक अग्रवाल (2019-20), अक्षर पटेल (2020-21), श्रेयस अय्यर (2021-22), यशस्वी जायस्वाल (2022-23)

(महिला) : प्रिया पुनिया (2019-20), शफाली शर्मा  (2020-21), एस. मेघना (2021-22), अमनज्योत कौर (2022-23)

दिलीप सरदेसाई पुरस्कार (2022-23): सर्वाधिक धावा: यशस्वी जैस्वाल; सर्वाधिक बळी: आर अश्विन.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (महिला): पूनम राऊत (2019-20), मिताली राज (2020-21), हरमनप्रीत कौर (2021-22), जेमिमा रॉड्रिग्ज (2022-23).

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी – महिला: पूनम यादव (2019-20), झुलन गोस्वामी (2021-22), राजेश्वरी गायकवाड (2021-22), देविका वैद्या (2022-23).

आणखी वाचा : 

मोठी बातमी! विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा, आरसीबीच्या खेळाडूला मिळाली संधी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget