मोठी बातमी! विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा, आरसीबीच्या खेळाडूला मिळाली संधी!
Virat Kohli Replacement : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची (Virat Kohli Replacement) घोषणा केली आहे.
Virat Kohli Replacement : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची (Virat Kohli Replacement) घोषणा केली आहे. Cricbuzz च्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याला स्थान दिले आहे. भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी सरफराज खान याच्या नावाचीही चर्चा होती. पण रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. सरफराज खान इंडिया अ संघासोबतच राहणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदार भारतीय संघासोबत जोडला आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, रजत पाटीदार हैदराबादमध्ये भारतीय संघासोबत जोडला आहे. गेल्य काही दिवसांतील शानदार फॉर्मुळे रजत पाटीदार याला संधी मिळाली आहे.
Rajat Patidar has replaced Virat Kohli for the first two Tests against England. (Cricbuzz). pic.twitter.com/3o4ndoSqb9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2024
रजत पाटीदारचा शानदार फॉर्म -
मध्यप्रदेशकडून खेळणाऱ्या रजत पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. त्याने आतापर्यंत 55 फर्स्ट क्लास सामन्यात 46 च्या जबरदस्त सरासरीने 4 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 22 अर्धशतके आहेत. रजत पाटीदार भारताच्या अ संघाचा सदस्यही आहे. त्याने नुकताच इंग्लंड लॉयन्सविरोधात 151 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 50 धावांत सहा विकेट गमावल्या तेव्हा रजतने 151 धावांची खेळी केली.
अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाचा रस्ता बंद -
रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आलाय की, विराट कोहलीच्या जागी चेतेश्वर पुजाराला संधी मिळू शकत होती. पुजाराने रणजी चषकात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. पण बीसीसीआय आता पुजारा आणि राहणे यांच्या पुढे विचार करत आहे. युवा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरण्याचा बीसीसीआयने विचार केला आहे. त्यामुळे पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता नाहीच.
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.
पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
आणखी वाचा :
प्लेईंग 11 मध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार, इंग्लंडविरोधात हे 11 शिलेदार उतरणार मैदानात?