रोहित एका षटकात जितक्या धावा करतो, तितक्या आफ्रिकेला 8 षटकात करता आल्या नाहीत, लाजीरवाणा विक्रम नावावर
कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Mohammed Kaif On AUS vs SA : ईडन गार्डन मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हराकिरी केली. ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. पहिल्या आठ षटकात आफ्रिकेला फक्त 10 धावा करता आल्या. दोन्ही सलामी फलंदाजही तंबूत परतले होते. बलाढ्य आफ्रिका संघाकडून प्रतिकार मिळेल, असाच अंदाज बांधला होता. पण त्यांनी लाजीरवाणी कामगिरी केली. विश्वचषकाच्या इतिहासात ही सर्वात संथ सुरुवात म्हणून नोंद झाली आहे. टेम्बा बवुमा याला तर खातेही उघडता आले नाही. क्विंटन डिकॉक फक्त तीन धावा काढून परतला. आफ्रिकेच्या खराब सुरुवातीनंतर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने मिश्किल टिप्पणी करत लाज काढली. मोहम्मद कैफचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय आहे.
यापेक्षा जास्त तर रोहित पहिल्या षटकात धावा काढतो...
आफ्रिकेच्या संथ आणि खराब सुरुवातीवर मोहम्मद कैफ याने टिप्पणी केली. मोहम्मद कैफ म्हणाला की, 'दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आठ षटकात फक्त 10 धावा काढल्या. पण इतक्या धावा करत रोहित शर्मा पहिल्याच षटकात काढतो... ' समालोचन करणाऱ्या कैफच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनाही आफ्रिकेची टिंगल उडवली.
Mohammed Kaif:
" South Africa scored 10 runs in 8 overs. Rohit Sharma scored 10 runs in the first over of boult in semi final. This is how he's changing the game."#RohitSharma𓃵 pic.twitter.com/dFsioA0anU
— Japher Ahmad Khan (@iamkhanzafar) November 16, 2023
/>
आफ्रिकेची खराब सुरुवात -
कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक वगळता आफ्रिकेसाठी चांगले असे काहीच झालं नाही. कॅप्टनसी सोडून दुसंर काहीच करू न शकलेला बवुमा स्वस्तात बाद झाल्यानंतर डॉट बॉलच्या प्रेशरमध्ये डिकॉकही बाद झाला. त्यानंतर वॅन देर दसेन आणि एडन मारक्रमही बाद झाला. त्यामुळे 12व्या षटकात 4 बाद 44 अशी स्थिती झाली. आफ्रिकेच्या इनिंगचा पहिला चौकार आठव्या षटकात आला. हेनरिक क्लासेन आणि डेविड मिलर सध्या मैदानावर आहेत. त्यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आहे. डेविड मिलर 35 तर क्लासेन 22 धावांवर खेळत आहे. क्विंटन डिकॉक याने 14 चेंडूत तीन धावा करुन बाद झाला. टेम्बा बवुमा याला चार चेंडूनंतरही खाते उघडता आले नाही. रासी वन दसेन याने 31 चेंडूनंतर सहा धावांचे योगदान दिले. एडन मार्करम याने 20 चेंडूत दहा धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे.
भारताचा फायनलमध्ये प्रवेश -
न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने फायनलमध्ये पोहचली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सेमीफायनलचा सामना सुरु आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर आफ्रिकेला फायनलचं तिकिट मिळेल. पण सामना झाला तर जिंकणारा संघाला अहमदाबादचे तिकिट मिळणार आहे.