Majha Katta: ...अन् ब्राव्होची हरवलेली बॅट सचिननं एका क्षणात ओळखली! मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील हा भन्नाट किस्सा नक्की वाचा
Majha Katta: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
Majha Katta: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो पहिला प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिन तेंडुलकरचे भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या संख्येने चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिन तेंडूलकर सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो. दरम्यान, सँडअप कॉमेडियन विक्रम साठ्ये (Vikram Sathye) यांनी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये घडलेल्या भन्नाट किस्साबद्दल त्यांनी सांगितलाय. ड्वेन ब्राव्होची हरवलेली बॅट सचिन तेंडूलकर यांनी एका क्षणात कशी ओळखली? हे साठ्ये यांनी सांगितलंय.
स्टॅंडअप कॉमेडीयन विक्रम साठ्ये दिग्गज खेळाडूंसमोर त्यांच्याच नकला करणं, त्यांच्या चालण्याची शैली, त्यांची बोलण्या-वागण्याची पद्धत या सर्व गोष्टी स्टॅंडअप कॉमेडीच्या माध्यमातून सादर करतात. दरम्यान अनेक खेळाडूंना विक्रमने केलेली नक्कल इतकी आवडते की त्यांना ती पुन्हा पुन्हा करायला सांगतात. खेळाडू वृत्ती असलेले हे खेळाडू कॉमेडीसुद्धा तशीच मनोरंजन म्हणून पाहतात आणि छान एंजॉय करतात! विक्रम साठ्ये यांनी नुकतीच माझा कट्ट्यावर हजेरी लावली. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना ड्वेन ब्रावोची बॅट हरवली होती. ती बॅट सचिन तेंडूलकरनं एका क्षणात कशी शोधली? हे साठ्येंनी सांगितलंय. ड्वेन ब्राव्होची मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये बॅट हरवली होती. ज्यामुळं ब्रावो त्याची बॅट शोधू लागला. त्यावेळी सचिन तेंडूलकर यांनी काही बॅट बोटानं वाजवून पाहिल्या आणि त्यातील ब्राव्होची बॅट कोणती? हे लगेच ओळखून दाखवलं, असं साठ्येंनी म्हटलंय.
एखाद्यावर राग व्यक्त करणं, ओरडणं, समजावणं एक वेळ सोपी गोष्ट आहे. पण, एखाद्याला हसवणं हे सर्वात कठीण काम आहे, असं म्हणायला हरकत नाही. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्रमंडळी असतात जे कायम आपल्या विनोदबुद्धीनं आपल्याला सतत हसवतात. इतरांना हसवणं हे केवळ मित्रपरिवारापर्यंत सीमित नसून यावर एखादी व्यक्ती करियरसुद्धा घडवू शकते. या क्षेत्राचं नाव म्हणजे स्टॅंडअप कॉमेडी! स्टॅंडअप हे आता जरी चर्चेत आलं असलं तरी हा प्रकार पु. ल. देशपांडेंपासून अनेकांनी कित्येक वर्षांपासून केलाय. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील स्टॅंडअप कॉमेडीयन्सचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. तर भाडिपासारखं एक मराठमोळं व्यासपीठ आहे जे मराठी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देतोय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-