IND Vs SA: सलग दोन सामन्यात पराभव, पण तरीही टीम इंडिया नाही बदलणार त्यांचा गेम प्लॅन; श्रेयस अय्यर म्हणतोय...
IND Vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मलिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघासाठी ही मालिका 'करो या मरो'च्या स्थितीत पोहोचलीय.
IND Vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मलिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघासाठी ही मालिका 'करो या मरो'च्या स्थितीत पोहोचलीय. पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारूनही भारताचा पराभव झाला. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजक कागगिरी करून दाखवली. ज्यामुळं भारताचा पराभव पत्कारावा लागला. या मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकायचा आहे. मात्र, तरीही भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात आपला गेम प्लॅन बदलणार नसल्याचं भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरनं संकेत दिले आहेत.
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 0-2 नं पिछाडीवर आहे. अय्यर म्हणाला की, "आम्ही नियोजन केले आहे की, काहीही झाले तरी आम्ही आक्रमक फलंदाजी करत राहू. जरी आम्ही विकेट गमावत राहिलो तरीही आम्ही आमच्या गेम प्लॅननुसार खेळ करू आणि पुढे जाऊ. आम्ही आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू." या मालिकेनंतर भारताच्या फलंदाजीचा प्लॅन बदलेल का, असं विचारलं असता अय्यर म्हणाला, "आमचे मुख्य उद्दिष्ट साहजिकच विश्वचषक आहे, त्यामुळं आम्ही त्यासाठी नियोजन करतो का ते पाहावं लागेल. त्यामुळे आमची अशी मानसिकता आहे जिथे आम्ही पूर्णपणे मुक्तपणे खेळत आहोत. आणि इतर कशाचाही विचार करत नाही."
दुसऱ्या टी-20 मालिकेत दिनेश कार्तिकला अक्षर पटेलनंतर फलंदाजीसाठी पाठवलेल्या ऋषभ पंतच्या निर्णयावर अनेक दिग्गज फलंदाजांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, "भारत शेवटच्या पाच षटकांमध्ये दिनेश कार्तिकचा विशेष फलंदाज म्हणून वापर करू पाहत आहे." दुसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलनं 11 चेंडूत अवघ्या 10 धावा केल्या. तर, दिनेश कार्तिकनं 21 चेंडूत 30 धावा करून नाबाद राहिला.
ऋषभ पंतच्या निर्णयावर सुनील गावस्कर नाराज
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, "अक्षर पटेलच्या आधी दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी पाठवायला हवं होतं. “कधीकधी तुम्ही खेळाडूंवर फिनिशर असल्याचा टॅग लावता. तसेच 15 व्या षटकानंतरच त्याला फलंदाजीला पाठवता येईल, असा विश्वास दाखवता. पण गरज भासल्यास अशा खेळाडूला लवकर पाठवण्याची गरज असते. त्याच्या मते तो खेळ समजून डाव पुढे घेऊन जाता येतो."
गौतम गंभीर काय म्हणाला?
गौतम गंभीरनंही ऋषभ पंतच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलाय. "तुम्ही कार्तिकला फक्त शेवटच्या तीन षटकांसाठी ठेवू शकत नाही. जर तुमच्याकडं फलंदाज असतील, तर त्याला 6 व्या क्रमांकावर पाठवा. कठीण परिस्थितीत तुम्हाला अधिक संधी असते", असं गंभीरनं म्हटलंय.
हे देखील वाचा-