IND vs SA 3rd T20: तिसर्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया विशाखापट्टणममध्ये दाखल, पाहा व्हिडिओ
IND vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ विशाखापट्टम येथे दाखल झालाय.
IND vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ विशाखापट्टम येथे दाखल झालाय. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. यामुळं आजचा सामना भारतीय संघासाठी 'करो या मरो'चा असणार आहे. या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, आजच्या सामन्यात भारताला पराभूत करून मालिका खिशात घालण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.
बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसत आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या टी-20 साठी विशाखापट्टणमला पोहोचलाय. येथे भारतीय खेळाडूंचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलंय. यासोबतच स्थानिक बँडही बोलावण्यात आलं होतं. टीम इंडियाचे खेळाडू श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि उमरान मलिकही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
व्हिडिओ-
पहिल्या टी-20 मध्ये भारताची निराशाजनक कामगिरी
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात भारतानं निश्चितच वर्चस्व गाजवलं, पण काही चुकांमुळं भारताच्या पदरात निराशा पडली
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा दारूण पराभव
कटक येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 18.2 षटकात भारतानं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात हेन्रिक क्लासेननं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताल पराभूत करून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 नं आघाडी घेतली.
हे देखील वाचा-