LLC 2022 : सेहवागच्या गुजरात जायंट्ससमोर हरभजनच्या मणिपाल टायगर्सचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Legends League Cricket : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आज गुजरात जायंट्स आणि मणिपाल टायगर्सचं या दोन्ही संघामध्ये सामना रंगणार आहे. यावेळी क्रिकेट जगतातील दिग्गज माजी खेळाडू मैदानात उतरतील.
LLC2, Gujrat Giants vs Manipal Tigers : जगभरातील क्रिकेट संघातील माजी दिग्गज क्रिकेटर सध्या भारतात लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेचे सामने खेळत आहेत. क्रिकेटर जरी माजी असतील तरी सामने रंगतदार होत आहेत. आयपीएल स्पर्धेप्रमाणेच विविध देशाचे खेळाडू एकमेंकासोबत मिळून सामने खेळत असल्याने सामने अधिक चुरशीचे होत आहेत. आजही (22 सप्टेंबर) गुजरात जायंट्स आणि मणिपाल टायगर्सचं (Gujrat Giants vs Manipal Tigers) हे संघ आमने सामने येणार आहेत.
आज सामना पार पडणाऱ्या दोन्ही संघामध्ये क्रिकेट जगतातील माजी दिग्गज खेळाडू असून गुजरात संघाचं नेतृत्त्व वीरेंद्र सेहवागकडे तर मणिपाल टायगर्सचं नेतृत्त्व हरभजन सिंह करणार आहे. आजचा सामना होणाऱ्या दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडू असल्याने आपले आवडते क्रिकेटर पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळतील, तर आज नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरु शकतात, यासाठी दोन्ही संघाचे संभाव्य अंतिम 11 पाहूया...
अशी असू शकते अंतिम 11
गुजरात जायंट्सचे संभाव्य अंतिम 11 - वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल (विकेटकीपर), केविन ओ ब्रायन, तिलकरत्ने दिलशान, लेंड्ल सिमन्स, थिसारा परेरा, रियाद एमरिट, ग्रीम स्वान, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लेघन आणि अशोक डिंडा.
मणिपाल टायगर्सचे संभाव्य अंतिम 11 - स्वप्निल असनोदकर, रविकांत शुक्ला, कोरी एंडरसन, मोहमम्द कैफ, ताताइंदा तायबू (विकेटकीपर), हरभजन सिंह (कर्णधार), शिवाकांत शुक्ला, रियान सायबॉटम, मपॉफ्यू आणि परविंदर अवाना.
कधी, कुठं पाहायचा सामना?
लीजेंड्स लीग क्रिकेटचा आजचा सामना (22 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
ऑक्टोबरमध्ये रंगणार फायनल
लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीजनमध्ये 4 संघानी सहभाग घेतला आहे. इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स अशी या संघाची नावं आहेत. ग्रुप स्टेजमध्ये हे चारही संघ प्रत्येकी 6-6 सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले जातील. लीगचा अंतिम सामना 5 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या :