IND vs ENG, Women ODI : दुसरा एकदिवसीय सामना जिंकत भारतीय महिलांनी रचला इतिहास, 23 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये मालिकाविजय
IND vs ENG, 2nd ODI Women Cricket : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून तीन एकदिवसीय मालिकांतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीत भारताने मालिकाविजय मिळवला आहे.
IND vs ENG, 2nd ODI Women Cricket : भारतीय महिलांनी (Indian Womens Cricket Team) इंग्लंडच्या महिला संघाला (England Cricket Team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Womens ODI) 88 धावांनी मात देत तीन एकदिवसीय सामन्यांच्या (ODI Cricket) मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे 1999 नंतर प्रथमच म्हणजेच 23 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडच्या मातीत मालिकाविजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 333 धावांचा डोंगर उभारला. ज्यानंतर इंग्लंडला 245 धावांत सर्वबाद करत 88 धावांनी सामना जिंकला. सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाबाद 143 धावांची तुफान खेळी केली आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंड संघाचा (IND vs ENG) सात विकेट्सनं पराभव केला होता.
Captain @ImHarmanpreet led from the front, hammering 143* & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat England by 88 runs in the 2⃣nd ODI to take an unassailable lead in the series. 👏 👏 #ENGvIND
— BCCI Women (@BCCIWomen) September 21, 2022
Scorecard ▶️ https://t.co/dmQVpiNH4h pic.twitter.com/lHrfOQDBX7
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पण फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांनी इंग्लंडचा हा निर्णय़ चूकीचा ठरवत अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवलं. शेफाली 8 धावा करुन बाद झाली असली तरी स्मृती मंधानाने 40 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली नाबाद 143 धावांची खेळी यादगार ठरली. हरलीन देवोलनेही 58 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी केली. या तिघींच्या खेळीच्या जोरावर भारताने 334 धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले.
इंग्लंडचा 88 धावांनी पराभव
मैदानात 334 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. अॅलिस कॅपिसी आणि डॅनियल वॅटने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अॅलिस 39 धावा करुन बाद झाली. अॅमि जोन्सने 39 धावांची साथ डॅनियलला दिली. चॅरलोट डीननेही 37 धावा केल्या. पण या सर्वजणी बाद झाल्या, डॅनियलनेही 65 धावांची एकहाती झुंज दिली, पण अखेर भारताच्या दमदार गोलंदाजीसमोर तिचाही निभाव लागला नाही आणि 245 धावांच इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने 88 धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या :