The Ashes 2023 : अॅशेजला 16 जून 2023 पासून सुरुवात, एजबेस्टनमध्ये होणार पहिला सामना, महिला अॅशेजचं वेळापत्रकही जाहीर
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अॅशेज 2023 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारी ही ऐतिहासिक मालिका जून, 2023 मध्ये सुरु होणार आहे.
![The Ashes 2023 : अॅशेजला 16 जून 2023 पासून सुरुवात, एजबेस्टनमध्ये होणार पहिला सामना, महिला अॅशेजचं वेळापत्रकही जाहीर The Ashes 2023 England vs Australia Schedule for Ashes 2023 announced starts June 23 The Ashes 2023 : अॅशेजला 16 जून 2023 पासून सुरुवात, एजबेस्टनमध्ये होणार पहिला सामना, महिला अॅशेजचं वेळापत्रकही जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/4aad3a5c6d8dc4f2f8aab9ed45e1541e1663780217008428_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
AUS vs ENG 2023 : क्रिकेट जगतातील एक मानाची आणि सर्वात जुनी कसोटी मालिका म्हणजे अॅशेज (Ashes). क्रिकेट जगतातील दिग्गज संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात खेळवल्या जाणार्या अॅशेसचा आगामी हंगाम (The Ashes 2023) 16 जून 2023 पासून सुरु होणार आहे. पहिला सामना इंग्लंडच्या एजबेस्टन मैदानात होणार आहे. तर अॅशेस 2023 ची शेवटची कसोटी 27 जुलैपासून ओव्हलवर सुरू होईल. याशिवाय लॉर्ड्स, हेडिंग्ले आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथेही अॅशेसचे सामने खेळवले जाणार आहेत.
आयसीसीनं अॅशेजच्या वेळापत्रकाबद्दल माहिती दिली असून कसोटी क्रिकेटचा विश्वचषक असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC 23) अंतिम सामना जून 2023 मध्ये इंग्लंडच्या ओव्हल मैदानात पार पडणार आहे. त्यामुळे इंग्लंडमधील कसोटी प्रेमींसाठी जून 2023 अगदी खास असणार आहे. दरम्यान अॅशेजचं संपूर्ण वेळापत्रकही आयसीसीनं जाहीर केलं असून नेमकं वेळापत्रक कसं आहे ते पाहूया...
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 16 जून ते 20 जून, 2023 | एजबेस्टन |
दुसरा कसोटी सामना | 28 जून ते 2 जुलै, 2023 | लॉर्ड्स |
तिसरा कसोटी सामना | 6 जुलै ते 10 जुलै, 2023 | हेडिंग्ले |
चौथा कसोटी सामना | 19 जुलै ते 23 जुलै, 2023 | ओल्ड ट्रॅफर्ड |
पाचवा कसोटी सामना | 27 जुलै ते 31 जुलै, 2023 | ओव्हल |
महिला अॅशेजचं वेळापत्रकही समोर
पुरुष क्रिकेट संघासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघातही अॅशेज मालिका पार पडणार आहे. यावेळी एकमेव कसोटी सामना 22 जून ते 26 जून, 2023 दरम्यान ट्रेन्ट ब्रीज मैदानात खेळवला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघ तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. यावेळी 1, 5 आणि 8 जुलै रोजी टी20 तर 12, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)