(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL, Head to Head : आजपासून भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात, कसा आहे दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास?
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. आज पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे.
IND vs SL, ODI Head to Head: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून (10 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरम येथे खेळवला जाईल. दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकुयात....
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 162 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 93 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सर्व सामन्यांचा विचार करता भारतीय संघाचा दबदबा श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यांमध्ये असल्याचं दिसून येत आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.
कुठे पाहाल सामने?
भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील (India vs Sri lanka ODI Series) सर्व सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट (Live Match) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-