IND vs SL : भारत श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, सामन्यासबंधी A टू Z माहिती एका क्लिकवर
IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होत आहे.
IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) आटोपली असून आता एकदिवसीय सामन्यांचा थरारा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. उद्यापासून अर्थात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होता आहे. विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर जसेकी रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून टी20 मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने ही एकदिवसीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर एकदिवसी. मालिकेबद्दलची सर्व माहिती पाहूया...
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 1.30 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 1.30 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 1.30 वाजता |
कसे आहेत दोन्ही संघ?
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
टीम श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.
कुठे पाहाल सामने?
भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-