IND vs SA : ''राम सिया राम'' गाणं ऐकताच केएल राहुलने विचारला असा प्रश्न, केशव महाराजचं उत्तर स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड; काय संभाषण झालं? पाहा VIDEO
KL Rahul and Keshav Maharaj : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यादरम्यान केएल राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
India vs South Africa Match : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) तीन सामन्यांनी वनडे मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना 21 डिसेंबरला खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना टीम इंडियाने (Team India) 78 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार (Indian Team Captain) केएल राहुल (KL Rahul) आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडू (South African Cricketer) केशव महाराज (Keshav Maharaj) यांचा एक व्हिडीओ (Video Viral) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. केएल राहुल आणि केशव महाराज यांच्यातील मैदानातील संभाषण स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टेडियममध्ये ''राम सिया राम'' गाणं
टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल विकेंटकिंपिग करताना दक्षिण आफ्रिकन खेळाडू केशव महाराज बॅटिंग करत होता. यावेळी दोघांचा संवाद स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला. विकेंटकिंपिग करताना केएल राहुलने बँटिंग करणाऱ्या केशव महाराजला प्रश्न विचारला केएल राहुलचा हा प्रश्न स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
केएल राहुलचा केश महाराजला प्रश्न
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल फ्रेंचायझी लखनौ सुपर जायंट्सने ट्विटर अकाऊंट म्हणजे आताच्या एक्स अकाऊंटवरून याचा व्हिडीओ शेअर केला आहे. केशव महाराज फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा स्टेडियममध्ये ''राम सिया राम...'' हे गाणं वाजू लागलं. केएल राहुलच्या कानावर हे गाणं पडल्यावर त्याने लगेच केशव महाराजला प्रश्न विचारला की, ''भाऊ, तू खेळायला आला की हे गाणं वाजतं.'' यावर केश महाराजने लगेच ''हो'' असं उत्तर दिलं. केशव महाराज भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू आहे.
पाहा व्हिडीओ : दोघांमधील नेमका संवाद काय?
Super Giants banter 😂😂😂 >>>>>pic.twitter.com/k0DxIrRqLN
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) December 21, 2023
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत आठ गडी गमावून 296 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने 108 धावांची दमदार खेळी खेळली. तर तिलक वर्माने अर्धशतक ठोकलं. याशिवाय रिंकू सिंहने जलद 38 धावांची चांगली खेळी केली. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढासळली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 218 धावांवर ऑलआऊट झाला. टोनी डी जॉर्जीने 81 धावा केल्या, पण त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा कोणताही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. केशव महाराज 27 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.
शतकी खेळीमुळे संजू सॅमसन ठरला सामनावीर
संजू सॅमसनच्या दमदार शतकासाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर संपूर्ण मालिकेत 10 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. आता 26 डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेसह मैदानात परतणार आहेत. या तिघांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळली नव्हती.