Ind vs Aus 3rd Test : गाबा कसोटीतून टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ऑस्ट्रेलियन संघाची वाढली डोकेदुखी; जाणून घ्या कारण
Josh Hazlewood Ind vs Aus 3rd Test : ब्रिस्बेन कसोटी सामन्यादरम्यान यजमान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला.
Josh Hazlewood Will Miss Remaining BGT Series After Injury : ब्रिस्बेन कसोटी सामन्यादरम्यान यजमान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर गेला आहे. तो केवळ या सामन्यातून बाहेरच नाही तर मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये त्याची खेळण्याची शक्यता जवळपास कमी आहे. जोश हेझलवूडला आज सकाळी सामनापूर्व सराव करताना दुखापत झाली. यानंतर त्याने सामन्यात केवळ एकच षटक टाकले आणि मैदानाबाहेर गेला.
Australian pacer Josh Hazlewood will not play any further part in the ongoing third Test against India at Brisbane and he is likely to miss remainder of Border-Gavaskar Trophy after sustaining right-side calf strain: Cricket Australia #BGT2024 #INDvsAUS pic.twitter.com/fBZSliklQ8
— Press Trust of India (@PTI_News) December 17, 2024
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
साइड स्ट्रेनमुळे ॲडलेडमधील शेवटचा कसोटी सामना खेळू न शकलेल्या हेझलवूडची ब्रिस्बेनमध्ये आतुरतेने प्रतीक्षा होती. त्याने परत येताच चांगली कामगिरी केली आणि सुरुवातीलाच विराट कोहलीची बहुमोल विकेट मिळवली. चौथ्या दिवशी हेझलवुड मैदान सोडल्यानंतर केएल राहुल आणि जडेजा यांनी 67 धावांची भागीदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव जाणवली. हेजलवूडला गाबा कसोटीतून बाहेर जाणे हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे.
Josh Hazlewood's calf strain will keep him out of the rest of the Test...
— 7Cricket (@7Cricket) December 17, 2024
And he is likely to miss the remainder of the series 😮
(via @plalor) #AUSvIND pic.twitter.com/CdsZop4Pfx
हेझलवुडची जागा कोण घेणार?
आता स्कॉट बोलंड चौथ्या कसोटीत जोश हेझलवूडच्या जागी खेळू शकतो. त्यानेच दुसऱ्या कसोटीत हेझलवूडची जागा घेतली होती आणि चमकदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. बोलंडने गेल्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 बळी घेण्यात तो यशस्वी ठरला. या खेळाडूने विराट कोहलीची विकेटही घेतली.
Josh Hazlewood appears set to miss the rest of the #AUSvIND Test series: https://t.co/c4KzFBMBCI pic.twitter.com/vEC6Qe6gWs
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2024
पुढील दोन कसोटी कुठे होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढील दोन कसोटी सामने मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार आहे.
हे ही वाचा -