एक्स्प्लोर

On This Day: आजच्या दिवशी धोनीनं रचला इतिहास, आयसीसीच्या प्रमुख तिन्ही ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला कर्णधार!

On This Day: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

On This Day: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, अजूनही उत्कृष्ट कर्णधाराच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. यामागचं कारणही तितकचं खास आहे, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं अनेक यशाचे शिखर गाठलंय. दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजेच 23 जून 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. 

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अशी काही कामगिरी केली आहे जी जगातील अन्य कोणत्याही संघाला जमली नाही. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.  आयसीसीच्या मर्यादीत षटकांच्या तिनही स्पर्धांचं विजेतेपद मिळवणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.

भारतासमोर 130 धावांचं लक्ष्य रोखण्याचं आव्हान
या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 50 षटका ऐवजी 20 षटकाचा खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 129 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक 43, रविंद्र जाडेजानं नाबाद 33 तर, शिखर धवननं 31 धावांची खेळी केली. 20 षटकात 130 धावांचे आव्हान काहीच नव्हते.

भारताचा पाच धावांनी विजय
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघानं 8 षटकात 46 धावांवर चार विकेट्स गमावले. अ‍ॅलिस्टर कुक, जोनाथन ट्रॉट, इयान बेल आणि जो रूट स्वस्तात माघारी परतले. त्यांनतर इयन मॉर्गन आणि बोपारानं डाव सावरत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असताना मॉर्गननं 33 आणि बोपारानं 30 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर इंग्लंडचा संघ धक्क्यातून सावरू शकला नाही आणि पाच धावांनी सामना गमावला.

आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार
या विजयासह धोनी क्रिकेट आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. शिखर धवनला प्लेअर ऑफ द सिरीज निवडलं गेलं. तर, रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget