1983 World Cup: झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी, पण कॅमेऱ्यात रेकार्ड नाही; वाचा कारण
1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघावर मात करून भारतानं इतिहास रचला आहे.या विश्वषकातील साखळी सामन्यात कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. पंरतु, विश्वचषकातील कपिल देव यांची नाबाद 175 धावांची उत्कृष्ट खेळी कॅमेऱ्यात कैद झाली नाही. यामागचं कारण काय? हे जाणून घेऊयात.
कपिल देवची नाबाद 175 धावांची खेळी कॅमेऱ्यात रेकार्ड नाही
1983 च्या विश्वचषकात भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात 18 जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारतानं 31 धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचं मोलाचं योगदान होतं. या सामन्यात त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.परंतु दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही. कारण त्यावेळी देशातील एकमेव प्रसारक बीसीसीनं देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळं कपिल देव यांची ही खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली नव्हती.
कपिल देव यांची प्रतिक्रिया
टेलिकॉम ऑपरेटरनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देव म्हणाले होते की, "मला लोकांवर टीका करायला आवडत नाही. लोक म्हणतात की, ते रेकॉर्ड झाले नाही याबद्दल तुम्हाला काही हरकत नाही? यावर मी नेहमी नाही म्हणतो. कारण ती खेळी आजही माझ्या मनात रेकॉर्ड आहे".
कपिल देव यांची कारकीर्द
कपिल देव यांनी भारताकडून 1970 भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यांनी 1994 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स आणि3 हजार 783 धावा केल्या आहेत. तर, कसोटीमध्ये त्यांनी 131 सामन्यात 434 विकेट्स आणि 5 हजार 248 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- On This Day: आजच्या दिवशी धोनीनं रचला इतिहास, आयसीसीच्या प्रमुख तिन्ही ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला कर्णधार!
- David Warner: एका धावानं डेव्हिड वार्नरचं शतक हुकलं! कसा झाला आऊट? पाहा व्हिडिओ
- David Warner: ऐकत नाही भाऊ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वार्नरच्या 16000 धावा, दिग्गजांच्या पंक्तीत स्थान!