हैद्राबादने जोफ्रा आर्चरला धू धू धुतला, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल; किती धावा कुटल्या?
Jofra Archer has the most expensive spell in IPL History : हैद्राबादने जोफ्रा आर्चरला धू धू धुतला, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल; किती धावा कुटल्या?

Jofra Archer has the most expensive spell in IPL History : आयपीएल 2025 मधील आजच्या (दि.23) पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने रॉयल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आत्तापर्यंत हा निर्णय महागडा ठरला असल्याचं चित्र आहे. कारण प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायजर्स हैद्राबादने 286 धावांचा डोंगर उभा केलाय आणि राजस्थान समोर 287 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे.
View this post on Instagram
जोफ्रा आर्चरने टाकला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल
हैद्राबादकडून ईशान किशनने शतकी खेळी केली तर ट्रेविस हेडने देखील फटकेबाजी केली. हैद्राबादने फटकेबाजी करताना राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला धू धू धुतलंय. कारण जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकलाय. जोफ्रा आर्चरने त्याच्या चार षटकांमध्ये 76 धावा दिल्या आहेत आणि त्याला एकही विकेट पटकावता आलेली नाही.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे स्पेल
जोफ्रा आर्चर (JOFRA ARCHER, Rajsthan Royals) : 4 ओव्हरमध्ये 76 धावा - 0 विकेट्स
मोहित शर्मा (Mohit Sharma, Gujarat Titans): 4 ओव्हरमध्ये 73 धावा (IPL 2024)
बेसल थंप्पी (Basil Thampi, Sunrisers Hyderabad): 4 ओव्हरमध्ये 70 धावा (IPL 2018)
यश दयाल (Yash Dayal, Gujarat Titans) 4 ओव्हरमध्ये 69 धावा (IPL 2023)
राजस्थानच्या सर्व गोलंदाजांची धुलाई
हैद्राबादकडून ईशान किशनने 47 चेंडूमध्ये 106 धावा तर ट्रेव्हिस हेडने 31 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी केली. राजस्थानकडून तुषार देशपांडेने 3, एम थीक्क्षणाने 2 तर संदीप शर्माने 1 विकेट पटकावली. राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजाने 10 पेक्षा जास्त स्टाईक रेटने धावा दिल्या. फक्त नितीश राणाने एक षटक टाकले त्यामध्ये हैद्राबादला 9 धावा काढता आल्या आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
