एक्स्प्लोर

क्लीनचीट देणं मुख्यमंत्र्यांचं काम नाही, खासदार पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला लावत असेल तर तो खूनच, त्यात खासदाराचा सहभाग असू शकतो; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालायला हवं. पण उलट मुख्यमंत्री क्लीनचीट देत आहेत, हे धक्कादायक आहे. क्लीनचीट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही.

Jitendra Awhad on Phaltan Doctor Case: फलटणमधील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माजी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.त्यांनी या घटनेला “इंस्टिट्यूशनल मर्डर” म्हणजेच संस्थात्मक खून म्हटलं असून, सरकारी यंत्रणेचाच यात हात असल्याचा गंभीर आरोप केला. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली आहे. डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे. 

“सरकारी यंत्रणेच्या छळामुळेच युवतीचा जीव गेला”

आव्हाड म्हणाले, “एका मागासवर्गीय उसतोड कामगाराच्या मुलीचा जीव गेला आहे. हा केवळ आत्महत्येचा प्रकार नाही. हा सरकारी यंत्रणेच्या छळवादाचा परिणाम आहे. हा इंस्टिट्यूशनल मर्डर आहे.” त्यांनी सांगितले की, “त्या तरुणीच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे की, तिला अन्याय आणि दबावाला सामोरं जावं लागलं. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालायला हवं. पण उलट मुख्यमंत्री क्लीनचीट देत आहेत, हे धक्कादायक आहे. क्लीनचीट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही.”

“पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला खासदार लावत असतील तर तो खूनच आहे”

आव्हाड यांनी थेट रणजितसिंह निंबाळकरांचं नाव घेत गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “जर एखादा खासदार डॉक्टरला पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला सांगत असेल, तर तो आत्महत्येचा नाही, थेट खुनाचा प्रकार आहे. आणि तो खून झाला असेल, तर त्या खासदारांचा सहभाग यात असू शकतो. याची चौकशी झालीच पाहिजे.”

“फडणवीस पंतप्रधानपदाचे उमेदवार, मग गुंड प्रवृत्तीचे लोक सोबत का?”

या प्रकरणाचा संदर्भ घेत आव्हाड यांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जात आहेत. मग अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवणं योग्य आहे का? याचा विचार त्यांनी करावा. कारण अशा घटनांनी सरकारचा आणि राज्याच्या प्रतिमेचा अपमान होतो.”

सुषमा अंधारे यांचाही निंबाळकरांवर गंभीर आरोप

दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणात निंबाळकरांवर गंभीर आरोप केला आहे. यात एका खासदार आणि त्यांच्या पीएचाही उल्लेख असून, या प्रकरणात भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर थेट आरोप केले. त्या म्हणाल्या, “ही आत्महत्या नाही, हत्या आहे.” अंधारे यांनी एका व्हिडिओचा उल्लेख करत निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील कार्यक्रमात निंबाळकरांना पाठिंबा देत “चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे म्हटले. त्यावर अंधारे यांनी फडणवीसांवर टीका करत “ही बीडच्या मुलीची संस्थात्मक हत्या आहे,” असा आरोप केला.

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget