'त्या दोघांना खेळायचे नाही...', शेवटी जय शाह यांनी केला खुलासा, सांगितले रोहित-विराट का खेळणार नाहीत देशांतर्गत क्रिकेट
Duleep Trophy 2024 Update News : याआधी बातमी आली होती की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये खेळताना दिसणार आहेत.
Jay Shah on Rohit Sharma And Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. पण दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी काल जाहीर झालेल्या संघांमधून मात्र या दोन खेळाडूंची नावे गायब होती. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये का खेळणार नाही. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी हे दोन खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये का खेळत नाहीत याचे स्पष्टीकरण दिले. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवून त्यांच्यावर कामाचा ताण वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे या खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका आहे.
यावेळी दुलीप करंडक स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार नाही. यासाठी ए, बी, सी आणि डी या नावांनी संघ जाहीर करण्यात आले आहेत. चारही संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अ संघाचा कर्णधार शुभमन गिल, ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन, क संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि ड संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे.
शुभमन गिलच्या अ संघात मयंक अग्रवाल, रायन पराग, केएल राहुल, ध्रुव जुरेल, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि कुलदीप यादवसारखे खेळाडू आहेत. यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा अभिमन्यू इसवरनच्या ब संघात समावेश करण्यात आला आहे.
रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे आणि उमरान मलिक या खेळाडूंचा गायकवाडच्या सी संघात समावेश करण्यात आला आहे. तर देवदत्त पडिक्कल, इशान किशन, अक्षर पटेल आणि हर्षित राणा या खेळाडूंचा श्रेयस अय्यरच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
दुलीप ट्रॉफी 2024चे पूर्ण वेळापत्रक
5-8 सप्टेंबर 2024 : भारत अ विरुद्ध भारत ब - स्थळ: ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर* (स्थळ बदलू शकते)
5-8 सप्टेंबर 2024 : भारत क vs भारत डी - स्थळ: ACA ADCA मैदान, अनंतपूर* (स्थळ बदलू शकते)
12-15 सप्टेंबर 2024 : भारत अ vs India डी - स्थळ: ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
12-15 सप्टेंबर 2024 : भारत ब विरुद्ध भारत क - स्थळ: ACA ADCA मैदान, अनंतपूर
19-22 सप्टेंबर 2024 : भारत अ विरुद्ध भारत क - स्थळ: ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर
19-22 सप्टेंबर 2024 : भारत ब विरुद्ध इंडिया डी – स्थळ: ACA ADCA मैदान, अनंतपूर