Jasprit Bumrah : विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बुमराह भावूक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला...
T20 World Cup 2022 : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी20 विश्वचषकाला मुकणार असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.
Jasprit Bumrah in T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशामध्ये टीम इंडियाला (Team india) मोठा झटका बसला असून संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातूनबाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकणार याबाबत बीसीसीआयनं (BCCI) अधिकृतरित्या जाहीर केलं. ज्यानंतर आता स्वत: बुमराहनेही आपली प्रतिक्रिया ट्वीट करत दिली आहे. ट्वीटमध्ये त्याने भावनिक संदेश लिहित, विश्वचषकातून बाहेर पडावं लागल्याचं फार दु:ख झालं आहे, असंही म्हटलं आहे.
जसप्रीत बुमराहने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, मी यंदा T20 विश्वचषकाचा भाग होणार नाही याचे मला दुःख आहे, परंतु माझ्या चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि समर्थनासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी बरा होताच ऑस्ट्रेलियात संघाला पाठिंबा देईन.''
I am gutted that I won’t be a part of the T20 World Cup this time, but thankful for the wishes, care and support I’ve received from my loved ones. As I recover, I’ll be cheering on the team through their campaign in Australia 🇮🇳 pic.twitter.com/XjHJrilW0d
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) October 4, 2022
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह विश्वचषकाबाहेर
मागील काही महिने बुमराह दुखापतीमुळे तसंच विश्रांती घेण्यासाठी संघात आत-बाहेर असल्याचं दिसून येत आहे. आता आशिया कपपूर्वी महिन्यात बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत होत, ज्यानंतर आता तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला मुकणार हे समोर आलं आहे.
बुमराहऐवजी कोण?
टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शामी दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे, संघातील महत्वाचा खेळाडूला दुखापत झाल्यास राखीव खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत दीपक चाहरनं चांगली गोलंदाजी केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. परंतु, जसप्रीत बुमराहऐवजी कोणाला भारतीय संघात संधी मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक चाहर, मोहम्मद शामी किंवा अन्य कोण? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हे देखील वाचा -