Suryakumar Yadav : 'सूर्यादादा'ची कमाल, टी20 मध्ये दिमाखात गाठला हजार धावांचा टप्पा, सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा पहिला फलंदाज
IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवने 1000 आंतरराष्ट्रीय टी20 धावा पूर्ण केल्या आहेत.

Milestone 🚨 - @surya_14kumar becomes the fastest batter to get to 1000 T20I runs in terms of balls (573) faced.#TeamIndia pic.twitter.com/iaFgAX8awu
— BCCI (@BCCI) October 2, 2022
भारतानं उभारला 237 धावांचा डोंगर
सूर्याच्या या खेळीसोबतच इतर फलंदाजांनीही तुफान खेळी करत भारताची धावसंख्या 237 पर्यंत नेली. यावेळी सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तडाखेबाज फलंदाजी करत अगदी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. दरम्यान रोहित 43 धावा करुन तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करुन 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारच्या 61 धावांसोबत विराट कोहली 49 धावांवर नाबाद राहिला. कार्तिकनेही नाबाद 17 धावा करत भारताची धावसंख्या 237 पर्यंत पोहोचवली.




















