Jasprit Bumrah News : फलंदाज ज्याला बघून घाबरतात, तो बुमराह कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? समोर आले मोठे कारण, व्हिडिओ
Mohammad Kaif Big Claim Jasprit Bumrah Test Retirement : जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर जात होता, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या.

Jasprit Bumrah To Quit Test Cricket : जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर जात होता, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या. जर भारताला मालिका जिंकायची असेल तर बुमराहची कामगिरी आवश्यक आहे, असे मानले जात होते. पण, या मालिकेत बुमराह अपेक्षित फॉर्ममध्ये दिसला नाही. आता एका माजी भारतीय क्रिकेटपटूने दावा केला आहे की इंग्लंड मालिकेनंतर बुमराह कसोटीला निरोप देऊ शकतो.
बुमराह या मालिकेत फारसा प्रभावी दिसला नाही. याचे एक कारण दुसऱ्या टोकाकडून मिळालेला पाठिंबा नसणे हे देखील आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही अशीच परिस्थिती दिसून आली. इंग्लंड दौऱ्यावर त्याने दोन डावात पाच बळी घेतले आहेत, परंतु दोन्ही सामने जिंकता आले नाहीत. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात, बुमराह तीन दिवसांच्या खेळापर्यंत निष्प्रभ राहिला.
बुमराह कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?
दरम्यान, जसप्रीत बुमराह याच्या भवितव्यावर मोठं वक्तव्य करत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, बुमराह (Jasprit Bumrah Retirement News) आता आपल्या कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. फिटनेसची साथ मिळाली नाही, तर तो लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असंही कैफ यांनी स्पष्ट केलं.
मँचेस्टरमध्ये बुमराहची चिंता वाढली!
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुमराहने नवीन चेंडूने केवळ एकच ओव्हर टाकली आणि लगेच मैदानाबाहेर गेला. जरी तो नंतर चहापानानंतर परतला, तरी त्याचा वेग 130 किमी/तासाच्या खाली गेला, जे बुमराहसाठी अत्यंत असामान्य मानलं जातं.
"स्वतःहून संन्यास घेईल बुमराह" - मोहम्मद कैफ
कैफ यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं, "मला वाटतं बुमराह पुढच्या कसोट्यांमध्ये कदाचित खेळणार नाही. तो स्वतःहूनच कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो. जर त्याला वाटलं की तो आता 100% देऊ शकत नाही, तर तो मागे हटेल." इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहने 28 ओव्हरमध्ये फक्त 1 विकेट घेतला आहे. त्याच्या गोलंदाजीत पूर्वीसारखी धार दिसून आलेली नाही, याकडेही कैफने लक्ष वेधलं.
Bumrah to retire from tests? pic.twitter.com/PnMR2y6oEi
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 26, 2025
फिटनेस बनतोय बुमराहसाठी डोकेदुखी
कैफ म्हणाले, "ज्यावेळी बुमराहने जैमी स्मिथला बाद केलं, तेव्हा विकेटकीपरला पुढे झेप घेत कॅच घ्यावा लागला. पण एक काळ होता, जेव्हा बुमराहच्या चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून बॉल जात होते. आता मात्र शरीर त्याला साथ देत नाहीये. जुनं जिद्दीचं बुमराह अजूनही आहे, पण त्याला गोलंदाजीमध्ये तो आनंद मिळत नाहीये."
हे ही वाचा -





















