एक्स्प्लोर
Joe Root News : सचिनच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण; एकामागून एक विक्रम मोडतो जो रूट, तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्यापासून इतक्या धावा दूर
Joe Root 2nd Highest Run Scorer in Test : इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने मँचेस्टर येथे भारताविरुद्ध शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 38वे शतक झळकावले.
Joe Root 2nd Highest Run Scorer in Test
1/8

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने मँचेस्टर येथे भारताविरुद्ध शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 38वे शतक झळकावले.
2/8

या डावात रूटने राहुल द्रविड, जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले.
3/8

पण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत रूट सचिन तेंडुलकरच्या मागे आहे आहे.
4/8

रूटने द्रविड (13,288), कॅलिस (13,289) यांना 31 धावा आणि रिकी पॉन्टिंग (13,378) ला 120 धावा करत मागे टाकले.
5/8

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या 15,921 कसोटी धावांचा विक्रम मोडण्यासाठी रूटला आणखी 2513 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत इंग्लंड संघासाठी रूटने 157 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13,409 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 38 शतके आणि 66 अर्धशतके आहेत.
6/8

कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत जो रूटने कुमार संगकाराच्या बरोबरी केली आहे. दोघांच्याही नावावर 38 शतके आहेत. सचिन तेंडुलकर (51), जॅक कॅलिस (45) आणि रिकी पॉन्टिंग (41) यांनी रूटपेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.
7/8

जो रूटने मँचेस्टरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त 22 धावांची आवश्यकता होती. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर कसोटीत एक हजार धावा करणारा रूट हा जगातील पहिला खेळाडू आहे.
8/8

जो रूट भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध 11 शतके झळकावली आहेत.
Published at : 25 Jul 2025 11:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















