James Anderson : जेम्स अँडरसनचा निवृत्तीबाबत यू टर्न? टी 20 क्रिकेट खेळण्याबाबत स्वत:सगळं सांगितलं
James Anderson : इंग्लंडचा दिग्गज वेगवान क्रिकेटपटू जेम्स अँडरसननं क्रिकेटमधून पूर्णपणे होण्याचा इरादा नसल्याचं म्हटलं आहे. अँडरसननं गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता.
लंडन : इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) यानं गेल्या महिन्यात अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तो जेम्स अँडरसनचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असं सर्वांना वाटलं होतं. जेम्स अँडरसननं वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल्याचं सर्वांना वाटलं होतं, मात्र त्यानं याबाबत घोषणा केली नव्हती. अँडरसननं एका महिन्यानंतर आता टी 20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) खेळण्याबाबत इच्छा जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या द हंड्रेड टुर्नामेंटमध्ये (The Hundred Tournament) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेम्स अँडरसन यानं 188 कसोटी सामन्यांमध्ये 704 विकेट घेतल्या आहेत.
जेम्स अँडरसन कसोटीमध्ये जगातील सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. तर, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसन यानं 194 कसोटी सामन्यांमध्ये 269 आणि टी 20 क्रिकेटमध्ये त्यानं 19 विकेट घेतल्या आहेत. अँडससननं 18 टी 20 सामने खेळले आहेत. अँडरसन यानं पहिला टी 20 मॅच 2009 मध्ये खेळली होती. तर त्यानं अखेरचा टी 20 सामना 2015 मध्ये खेळला होता.
जेम्स अँडरसननं वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिके दरम्यान निवृत्ती घेतली होती. यानंतर संघाचा तो बॉलिंग मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पडत होता. अँडरसननं पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेतली होती.
अँडरसन यानं 2015 नंतर टी 20 क्रिकेट खेळलेलं नाही. क्रिकेट खेळाडू म्हणून करिअरच्या अखेरच्या टप्प्यावर जेम्स अँडरसनला छोट्या फॉरमॅटमध्ये खेळायची इच्छा आहे. पीए वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, जेम्स अँडरसननं छोट्या फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत इच्छा दर्शवली आहे. यापूर्वी अँडरसननं कोणत्याही फ्रँचायजीसाठी क्रिकेट खेळलेलं नाही.
या वर्षीच्या द हंड्रेड ट्रॉफीत बॉल स्विंग होत असल्याचं पाहून मी या स्पर्धेत खेळू शकतो, असं वाटत असल्याचं जेम्स अँडरसन यानं म्हटलं. मी यापुढं कधी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणार नाही, हे माहिती आहे. मात्र माझ्या करिअरवर कोणताच निर्णय घेतलेला नाही, असं जेम्स अँडरसन म्हणाला.
काही दिवसांनंतर पुढच्या वर्षी क्रिकेट खेळू शकतो याबाबद विचार करणार आहे, असं अँडरसन म्हणाला. मी कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. सध्या क्रिकेट खेळण्यासाठी फिट आहे, मात्र स्वत:ला कोणत्याही गोष्टीपासून दूर ठेवू शकत नाही, असं अँडरसन म्हणाला.
टी 20 क्रिकेट खेळण्यासाठी फिट : अँडरसन
लोकांना मला कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळायला पाहताना आवडेल किंवा आवडणार नाही, हे सांगणं अवघड आहे. यासाठी मी वाट पाहणार आहे. मला टी 20 क्रिकेट खेळून खूप वेळ झालेला आहे. माझ्या वयाचा मुद्दा देखील पुन्हा उचलला जाईल. मात्र, मला वाटतं की क्रिकेटच्या या प्रकारात खेळण्यासाठी फिट आहे, असं जेम्स अँडरसन म्हणाला.
संबंधित बातम्या :
क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी; 1 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश