एक्स्प्लोर

Ind vs Eng 5th Test : 'क्रिकेट कुणासाठीच थांबत नाही...' इंग्लंड मालिकेनंतर इरफान पठानचं खोचक ट्विट; विराटला केलं टार्गेट? नेमकं काय म्हणाला?

England vs India 5th Test Update : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या युवा भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Irfan Pathan probably takes a dig at Rohit Sharma and Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या युवा भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मालिकेच्या सुरुवातीस अनेक जणांचं मत होतं की, नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा अनुभवहीन संघ इंग्लंडमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जाईल. पण असं काहीच घडलं नाही. या 'यंग ब्रिगेड'ने पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. ओव्हलवर झालेल्या निर्णायक पाचव्या कसोटीत भारताने 6 धावांनी थरारक विजय मिळवत मालिका वाचवली.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दाखवलेली लढवय्यी कामगिरी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. या दरम्यान, मालिका संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठान याचं एक ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. अनेकांनी या ट्विटचा संदर्भ रोहित-विराटवर अप्रत्यक्ष टोला म्हणून घेतला आहे.

खरं तर, इंग्लंड दौऱ्याच्या आधी म्हणजेच मे महिन्यात, आयपीएल 2025 दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, टीम इंडियाच्या कसोटी सामन्यांवरील लोकप्रियता आता कमी होईल आणि इंग्लंडमधील कामगिरीही फिकी ठरेल. मात्र शुभमन गिलच्या नेतृत्वात या तरुण खेळाडूंनी आपल्या जिद्दीने सर्व समीकरणं उलथून टाकली. त्याचाच प्रभाव इरफान पठान यांच्यावरही झाला.

आपल्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरून इरफान पठान याने लिहिलं की, "ही मालिका पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देते, की क्रिकेट कोणासाठी थांबत नाही."

या मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली होती. लीड्समध्ये इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली. त्यानंतर एजबॅस्टनमध्ये भारताने जोरदार प्रत्युत्तर देत इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं. लॉर्ड्सवर मात्र इंग्लंडने पुन्हा पुनरागमन करत 22 धावांनी विजय मिळवला. मँचेस्टरची कसोटी बरोबरीत सुटली आणि अखेरच्या ओव्हल कसोटीत भारताने 6 धावांनी विजय मिळवत मालिकेचा समतोल साधला. या सर्व सामन्यांचे निकाल पाचव्या दिवशी लागले, यावरून दोन्ही संघांमध्ये किती जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला हे स्पष्ट होते.

हे ही वाचा - 

Ind vs Eng 5th Test : चुक ध्रुव जुरेलकडून झाली, मग DSP सिराज कर्णधारावर का भडकला? सामना संपल्यानंतर शुभमन गिल केला खुलासा, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget