Ind vs Eng 5th Test : चुक ध्रुव जुरेलकडून झाली, मग DSP सिराज कर्णधारावर का भडकला? सामना संपल्यानंतर शुभमन गिलने केला खुलासा, नेमकं काय घडलं?
Mohammed Siraj Clash With Shubman Gill in 5th Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत एक असा क्षण आला, जेव्हा सिराज आपल्या कर्णधारावर चक्क भडकला.

England vs India 5th Test Update : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यातील मैत्रीपूर्ण नातं सर्वश्रुत आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत एक असा क्षण आला, जेव्हा सिराज आपल्या कर्णधारावर चक्क भडकला. गिलची एक चूक टीम इंडियाला महागात पडू शकली असती, पण शेवटी सिराजने निर्णायक विकेट घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
शुभमन गिलने मोहम्मद सिराजचं ऐकलं का नाही?
भारताच्या विजयानंतर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज पत्रकार परिषदेला गेले होते, एका पत्रकाराने सिराजला प्रश्न विचारला की, "शुभमन गिल तुमचं ऐकतो का? कारण सामन्यात दोन वेळा तुम्ही गिलला म्हणालात की 'तू त्याला सांगितलं नाही.'
त्यावर सिराज हसत उत्तर देतो, "आमच्यात कम्युनिकेशन खूपच चांगलं आहे. आमचं नातं फार पूर्वीपासून आहे. आम्ही भारतासाठी एकत्र खेळलोय, गुजरात टायटन्समध्येही हा माझा कॅप्टन होता, त्यामुळे याचा क्रिकेटिंग समज मला माहीत आहे. आणि हो, जेव्हा मी काही सांगतो, तेव्हा हा ऐकतो."
'ती' एक चूक जी भारताला महागात पडू शकली असती
सामना अत्यंत रोमांचक टप्प्यावर होता. भारताला फक्त एकच विकेट हवी होती, तर इंग्लंडला विजयासाठी 11 धावांची गरज होती. अशा वेळी भारताला गस ॲटकिन्सनला एकही धाव घेऊ द्यायची नव्हती, जेणेकरून पुढच्या ओव्हरमध्ये फ्रॅक्चर असलेल्या क्रिस वोक्सकडे स्ट्राइक राहील, जो फक्त एका हाताने फलंदाजी करत होता.
Siraj had a lot of moments but one that stuck with me was when Jurel missed the run out and he looked at Gill with the most stunned and heartbroken look
— Saahil Sharma (@faahil) August 4, 2025
“Nahi bola tu”
The man felt betrayed 😂 pic.twitter.com/pM2kevtQnb
मात्र गस ॲटकिन्सन आणि वोक्सने एक धाव घेतली. ध्रुव जुरेल रनआउटची संधी गमावतो. तेव्हा संतापलेल्या सिराजने गिलकडे पाहून म्हटलं की, "तू सांगितलं नाही त्याला..."
गिलने दिलं स्पष्ट उत्तर, मग दोघेही हसले
या प्रसंगावर बोलताना गिलने स्पष्ट केलं की, "हो, याने मला सांगितलं होतं. पण मी बोलायच्या आधीच सिराज धावायला लागला आणि ध्रुवला वेळ मिळालाच नाही. मग रनआउट चुकला. मग याने मला विचारलं, 'तू त्याला ग्लव्ह्स काढायला का सांगितलं नाही?' हीच ती वेळ होती." हे सांगताना दोघंही हसू लागले.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मध्ये काही विक्रम
- एकूण, या मालिकेत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा (7187 धावा) झाल्या.
- मालिकेत सर्वाधिक 300+ धावा केल्या गेल्या, 14 वेळा (विक्रमाशी बरोबरी केली).
- 9 फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या. हा देखील एक विक्रम आहे.
- मालिकेत 50 वेळा एका फलंदाजाने 50+ धावा केल्या, येथेही विक्रमाची बरोबरी झाली.
- 21 शतके केली, ही देखील बरोबरी झाली.
- 19 वेळा 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली, विक्रमाशी बरोबरी झाली.





















