एक्स्प्लोर

Irfan Pathan On IPL Commentary : रोहित-विराट नव्हे, तर 'या' सहकाऱ्याने केला होता इरफान पठाणचा घात, कॉमेंट्री पॅनलमधून हाकललं

Irfan Pathan On IPL Commentary : माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आयपीएल 2025 मध्ये कमेंट्री करणार दिसला नाहीत.

Irfan Pathan Break Silence On Ipl Commentary : आयपीएल 2025साठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही दिवसांतच स्पर्धेची सुरुवात होणार होती. कमेंट्री पॅनेलमध्ये कोणते दिग्गज असतील याची यादीही ठरून गेली होती. मात्र, याच वेळी आयपीएलकडून अशी एक घोषणा करण्यात आली की ऐकून सर्वच जण थक्क झाले. ही घोषणा होती माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आयपीएल 2025 मध्ये कमेंट्री करणार नाहीत.

मैदानावर चमकदार कारकीर्द घडवलेल्या इरफान पठाण याने कमेंट्रीच्या जगातही आपली वेगळी छाप सोडली होती. त्याच्या दमदार विश्लेषणाला आणि सरळ बोलण्याला प्रेक्षकही पसंती देत होते. अशा वेळी अचानकच त्याला कमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आलं, हे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरलं.

यानंतर लगेचच या निर्णयामागचं कारणही उघड झालं. समजलं की टीम इंडियातील काही खेळाडू इरफान पठाणच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि टीकेमुळे नाराज आहेत. त्याच्या आग्रहावरूनच ब्रॉडकास्टरने त्याला कमेंट्री पॅनेलमधून बाहेर केल्याची चर्चा रंगली. मात्र, आता काही महिने उलटल्यानंतर इरफान पठाणने अखेर या वादावर मौन सोडलं आहे.

इरफान पठाण काय म्हणाला?

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या प्रकरणावर उघडपणे भूमिका मांडली. आयपीएलमधून वगळण्यामागे विराट कोहली आणि रोहित शर्मा असू शकतात, अशी चर्चा होती. आता तर हार्दिक पांड्याचे नावही समोर आले आहे. जरी इरफान पठाण यांनी कुणाचं नाव थेट घेतलं नाही, तरी माध्यमांमधील अहवालांनुसार हार्दिक पांड्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

इरफान पठाण म्हणाला की, "आयपीएलमध्ये 14 सामने होतात. त्यात जर मी सात सामन्यांमध्ये टीका केली असेल, तर तीही मी खूपच सौम्य ठेवली होती. तुम्ही 14 वेळा चुका केल्या, पण मी फक्त सात वेळाच बोललो. कारण ती माझी जबाबदारी आहे. टीका ही कामगिरीच्या आधारेच केली जाते."

"मी नेहमीच सर्वांना आधार दिला आहे...."

तो पुढे म्हणाला की, "क्रिकेट खेळताना टीका होणं अपरिहार्य आहे. भारतातील महान खेळाडू सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांनाही टीका सहन करावी लागली होती. पण त्यांनी कधीच हे दाखवून दिलं नाही की ते खेळापेक्षा मोठे आहेत. त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे."

मुलाखतीदरम्यान हार्दिक पंड्याबरोबरच्या नातेसंबंधांबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर इरफान पठाण यांनी उत्तर दिलं की, "आमच्यात कोणतीही स्पर्धा किंवा कटुता नाही. बडोद्याच्या क्रिकेटपटूंमध्ये असा एकही खेळाडू नसेल जो म्हणेल की इरफान आणि युसुफ पठाण यांनी आम्हाला साथ दिली नाही. दीपक हुड्डा असो किंवा हार्दिक-पांड्या बंधू. मी तर सुरुवातीच्या काळात सनरायझर्स संघासाठी हार्दिक पंड्याला शिफारसदेखील केली होती."

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Bollywood Actor Struggle Life: ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Embed widget