(Source: Poll of Polls)
IPL 2024 Captains : धोनी चेन्नईचा तर मुंबईची धुरा हार्दिककडे, 10 संघाचे 10 कर्णधार कोणते?
IPL 2024 Captains : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे.
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी काही संघामध्ये मोठे बदल झाले आहेत. 2024 स्पर्धा सुरु होण्याआधी काही संघाच्या कर्णधारामध्ये बदल झालाय. सनरायजर्स हैदराबादने एडन मार्करमला काढून पॅट कमिन्सकडे नेतृत्व सोपवलेय. त्याशिवाय मुंबई, गुजरात आणि दिल्ली अन् कोलकाताचे कर्णधारही बदलले आहेत.
ऋषभ पंत दुखापतीनंतर सावरलाय, तो मैदानावर परतण्यासाठी सज्ज झालाय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ऋषभ पंत नेतृत्व करताना दिसेल. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर कोलकात्याचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यर दिसणार आहे. आयपीएलमध्ये दहा संघाचे कोण कोणते कर्णधार असतील... त्या संघाचा कोच कोण असेल? त्याशिवाय कर्णधारपदासाठी पर्याय कोणता उपलब्ध असेल? याबाबत जाणून घेणार आहोत.
आयपीएलमधील दहा संघाचे कर्णधार, प्रशिक्षक आणि बॅकअप कर्णधार कोण कोण असेल ?
संघ | कर्णधार | मुख्य प्रशिक्षक | बॅकअप कर्णधार |
चेन्नई सुपर किंग्स | एमएस धोनी | स्टिफन फ्लेमिंग | ऋतुराज गायकवाड |
दिल्ली कॅपिटल्स | ऋषभ पंत | रिकी पाँटिंग | डेविड वॉर्नर |
कोलकाता नाईट रायडर्स | श्रेयस अय्यर | चंद्रकांत पंडित | नितीश राणा |
गुजरात टायटन्स | शुभमन गिल | आशिष नेहरा | राशीद खान |
लखनौ सुपर जायंट्स | केएल राहुल | जस्टीन लँगर | निकोलस पूरन |
मुंबई इंडियन्स | हार्दिक पांड्या | मार्क बाऊचर | सूर्यकुमार यादव |
पंजाब किंग्स | शिखर धवन | Trevor Bayliss | सॅम करन |
राजस्तान रॉयल्स | संजू सॅमसन | कुमार संगाकारा | जोस बटलर |
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | फाफ डु प्लेसिस | अँडी फ्लॉवर | विराट कोहली |
सनरायजर्स हैदराबाद | पॅट कमिन्स | डॅनियल व्हिट्टोरी | एडन मार्करम |
आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं शेड्यूल
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
- सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, वायझॅग, संध्याकाळी 7.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता