एक्स्प्लोर

TATA IPL: आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलला पंधाराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलला पंधाराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून (Playing 11) डीआरएसपर्यंत (DRS) काही बदल करण्यात आलेत. दरम्यान, कोरोना महामारीचा (COVID-19) क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय. आयपीएलच्या संघातील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करता येणार आहे, असाही नियम बनवण्यात आलाय. 

प्लेईंग इलेव्हनबाबत नवा नियम काय?
बीसीसीआयच्या हवाल्यानं क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. परिणामी, संबंधित संघाला अनेक समस्यांना सामोरे जावा लागले आहे. मात्र, बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, कोरोनामुळं संघाला प्लेइंग इलेव्हन तयार करण्यात अडचण आल्यास त्यांचा सामना पुन्हा शेड्युल केला जाणार आहे. मात्र, त्यानंतरही हा सामना होऊ न शकल्यास तांत्रिक समितीकडे हे प्रकरण पाठवलं जाईल. जर एखादा संघ सामना रिशेड्युल करण्यास अपयशी ठरल्यास त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण दिले जाणार आहेत. 

डीआरएसच्या नियमातील बदल महत्त्वाचा
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्रत्येक संघाला एकूण चार डीआरएस मिळणार आहेत. त्यातील दोन डीआरएस फलंदाजी आणि इतर दोन क्षेत्ररक्षण करताना वापरता येणार आहे. म्हणजे, संघाला प्रत्येक डावात दोन डीआरएस असणार आहेत. याआधी संघाला एका डावात केवळ एक डीआरएस मिळायचा.

सुपर ओव्हरबाबत बीसीसीआयनं घेतला हा निर्णय
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सुपर ओव्हरबाबत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात सामना अनिर्णित ठरल्यास सुपर ओव्हर खेळली जाते. परंतु, सुपर ओव्हर खेळल्यानंतरही सामन्याचा निकाल न लागल्यास दोन्ही संघाचा लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल.  जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Most NO-balls In Test Match : कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
IND vs SL 1st TEST : चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; शुभमन गिलच्या कॅचने सगळे हैराण, श्रीलंकेचा फलंदाजही बघत बसला, VIDEO
चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; शुभमन गिलच्या कॅचने सगळे हैराण, श्रीलंकेचा फलंदाजही बघत बसला, VIDEO
IND vs SL 1st Test DAY-3 Live : गॉलमध्ये भारताचा धडाका! श्रीलंकेची अवस्था बिकट, लंचपर्यंत 99 धावांत 5 फलंदाज तंबूत; जाणून घ्या Live अपडेट्स
गॉलमध्ये भारताचा धडाका! श्रीलंकेची अवस्था बिकट, लंचपर्यंत 99 धावांत 5 फलंदाज तंबूत; जाणून घ्या Live अपडेट्स
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget