Faf du Plessis On MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाबाबत फॅफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डू प्लेसिस (Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं (RCB) नेतृत्व करणार आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डू प्लेसिस (Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं (RCB) नेतृत्व करणार आहे. आरसीबीच्या संघानं त्याला आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) विकत घेतलं आहे. यापूर्वी तो चेन्नईच्या संघाचा (CSK) भाग होता. दरम्यान, कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर फॅफ डू प्लेसिसनं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत (MS Dhoni) मोठं वक्तव्य केलं आहे.
आरसीबीला दिलेल्या मुलाखतीत फाफ डू प्लेसिस म्हणाला की, "ज्यावेळी मी चेन्नईच्या संघात सामील झालो तेव्हा एमएस धोनीचं नेतृ्त्व पाहून मी आश्चर्यचकीत झालो. मी दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळतानाचा अनुभव पूर्णपणे वेगवेगळा होता. संघाचं नेतृत्व करताना स्वतःची शैली असणं महत्त्वाचं असते. त्यामुळं मी विराट कोहलीसारखं बनण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारण, मी कोहली नाही. तसेच मी एमएस धोनीसारखा बनण्याचाही प्रयत्न करू शकत नाही".
आयपीएलमध्ये फाफ डू प्लेसिसनं आतापर्यंत 100 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यानं 2 हजार 935 धावा केल्या आहेत. ज्यात 22 अर्धशतकं ठोकली आहेत. फॅफ डू प्लेसिसची 96 धावा सर्वोच्च धावसंख्या आहे. शनिवारी आरसीबी अनबॉक्स फ्रँचायझी कार्यक्रमात फाफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी संघाच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
हे देखील वाचा-
- Rishabh Pant Record : कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, पंतनं रचला इतिहास
- IND vs SL 2nd Test Live: भारताचं सामन्यावर वर्चस्व, लंचब्रेकपूर्वी 342 धावांची आघाडी
- Sachin on Sreesanth's Retirement: 'तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज होतास, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा', सचिनची श्रीशांतसाठी खास पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha