एक्स्प्लोर

Inter Club Women's Cricket League : महिला दिनानिमित्त MCA कडून पहिल्यांदाच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन, 52 क्लब सहभागी

Inter Club Women's Cricket League : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. या लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले आहेत.

Inter Club Women's Cricket League  : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (Mumbai Cricket Association) जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day) यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं (Womens Cricket League) आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेटला सध्या प्राप्त होत असलेलं ग्लॅमर आणि बीबीसीआयने (BCCI) नुकतंच सुरु केलेलं महिला आयपीएल, यामुळे ही महिला क्रिकेट लीग तरुण खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म ठरु शकते. 

या लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून 780 महिला खेळाडूंना या स्पर्धेमधून क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स यामधील उद्घाटनीय सामन्यातून मुंबईच्या क्रॉस मैदानातून या लीगला सुरुवात झाली. बीसीसीआयच्या सदस्या सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) या सामन्याला उपस्थित आहेत.

प्रत्येक गटातील सामने चुरशीचे होणार!

एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये 52 महिला संघ 13 गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले गेले आहेत. साखळी सामन्यांमधून गट-विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. मुंबईतील ऐतिहासिक अशा कांगा साखळी स्पर्धेने जसे भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले तशाच अनेक महिला क्रिकेट खेळाडू मुंबईला आणि पर्यायाने भारताला मिळावेत या हेतूने ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.

आज खेळवले जाणारे जाणारे सामने!

नवरोज क्रिकेट क्लब वि. पी.जे. हिंदू जिमखाना, स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप मुंबई वि. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, आवर्स क्रिकेट क्लब वि. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, नॅशनल क्रिकेट क्लब वि. स्पोर्टिंग युनियन क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब वि. प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब वि. माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे वि. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब वि. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, एम.आय.जी. क्रिकेट क्लब वि. वरळी स्पोर्ट्स क्लब, मुंबई पोलीस जिमखाना वि. जे. भाटीया स्पोर्ट्स क्लब इत्यादी लढती आज मुंबईतील 13 क्रिकेट खेळपट्ट्यांवर खेळवल्या जाणार आहेत.

विनामूल्य पाहता येणार गुजरात जायंट्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु WPL सामना

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 च्या निमित्ताने, महिला प्रीमियर लीगच्या आयोजकांनी सर्व क्रीडाप्रेमींना खास भेट दिली आहे. 8 मार्च रोजी म्हणजेच आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणाऱ्या गुजरात जायंट्स (Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR IPL 2026 : आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं! राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये
आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं! राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये
SRH vs RR Score IPL 2026 : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
SRH vs RR Update : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
Who Is Praful Hinge : कष्टाचं चीज झालं... 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्ट्या प्रफुल्ल हिंगे कोण? वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक
कष्टाचं चीज झालं... 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्ट्या प्रफुल्ल हिंगे कोण? वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक
Abhishek Sharma Golden Duck : रोहित शर्मा- संजू सॅमसनचा नकोसा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावावर, राजस्थानविरुद्ध नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा- संजू सॅमसनचा नकोसा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावावर, राजस्थानविरुद्ध नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget