एक्स्प्लोर

INDW vs NEPW: टीम इंडियाचा दणदणीत विजय, नेपाळवर 82 धावांनी विजय, पाकिस्तानला सेमी फायनलची लॉटरी

INDW vs NEPW Women Asia Cup 2024: महिला आशिया कप 2024 मध्ये भारतानं नेपाळला 82 धावांनी पराभूत केलं आहे. भारतानं ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहेत.

कोलंबो: श्रीलंकेत महिला आशिया कप (Women Asia Cup 2024) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तानसह एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. भारत आणि नेपाळ (INDW vs NEPW) यांच्यात आशिया कपमधील सामना पार पडला. या मॅचवर भारतानं एकहाती वर्चस्व ठेवलं. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 178 धावा केल्या होत्या. तर, नेपाळचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 96 धावा केल्या. भारतानं नेपाळवर 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आजच्या पराभवामुळं नेपाळचं स्पर्धेतील आव्हान संपलं. नेपाळच्या पराभवामुळं पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.  

भारतानं नेपाळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 3  विकेटवर 178 धावा केल्या होत्या. नेपाळला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 179 धावांची गरज होती. मात्र, नेपाळच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. नेपाळनं 21 धावांमध्येच दोन विकेट गमावल्या. कॅप्टन इंदू बर्मा आणि सीता मगर यांनी 22  धावांची भागिदारी केली. मात्र, पुढच्या 6 बॉलमध्ये दोघी बाद झाल्या. इंदू बर्मानं 14  तर सीता मगरंन 18 धावा केल्या. यावेळी नेपाळची स्थिती 4  विकेटवर 52 धावा अशी होती.यानंतर पुढील 40  धावांमध्ये नेपाळनं आणखी चार विकेट गमावल्या. नेपाळच्या 7  फलंदाजांना 10 धावा देखील करता आल्या नाहीत.  

भारताच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा

टीम इंडियाला पहिलं यश अरुंधती रेड्डीनं मिळवून दिलं. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये समझाना खडका हिला तिनं 7 धावांवर बाद केलं. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी नेपाळला मोठे धक्के दिले.दीप्ती शर्मा हिनं 10 धावा देत 3 विकेट घेतल्या. राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रेणुका सिंहनं एक विकेट घेतली.  

भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये

भारतानं महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. भारतानं ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकले. तर, भारतानं नेपाळला पराभूत केल्यानं पाकिस्तानचा देखील उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. बी ग्रुपमधील पहिल्या दोन स्थानावरील संघ निश्चित न झाल्यानं उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान विरुद्ध कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.    

संबंधित बातम्या :

Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं कुणाच्या नावावर, टॉप 5 मध्ये 'या' देशांचा समावेश  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget