एक्स्प्लोर

MCA Election: एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा दणदणीत विजय, संजय नाईक पराभूत 

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत.अध्यक्षपदासाठी एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यात लढत झाली होती. 

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Mumbai Cricket Association President Election) अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत.अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांना 221 मतं मिळाली आहेत. संजय नाईक (Sanjay Naik) यांना 114 मतं मिळाली आहेत. अजिंक्य नाईक यांना 107 मतांनी विजय मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. अजिंक्य नाईक वयाच्या 38 व्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. या विजयांनतर अजिंक्य नाईक यांनी हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं म्हटलं.

अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्यानिमित्तानं आशिष शेलार संजय नाईक यांच्यासाठी ताकद लावताना पाहायला मिळाले. तर, अजिंक्य नाईक यांच्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद विभागली गेलेली होती. 

अजिंक्य नाईक यांनी विजयानंतर आमच्या मैदान क्लब, क्रिकेटर्स,शाळा आणि कॉलेज, क्लब सेक्रेटरी यांचा विजय आहे. ही दुखाची निवडणूक आहे. हा जो विजय आहे तो खरंतर अमोल काळेंचा विजय आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी निवडणूक लढलो होतो. शरद पवार आणि इतर पक्षातील राजकीय नेते यांचे आभार मानतो. क्रिकेटसाठी काम सुरु ठेवणार आहे. माझ्या सारख्या तरुणावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,असं अजिंक्य नाईक म्हणाले. 

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी किती मतदान झालं?  

आज एमसीएच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. एमसीएच्या एकूण 375 मतदारांपैकी 335 प्रतिनिधींनी मतदान केलं आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाकरता प्रतिष्ठेची झालेली निवडणूक प्रक्रिया एमसीएच्या मुख्यालयात पार पडली होती. अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे अध्यक्षपदासाठी एकमेकांच्यासमोर उभे ठाकले होते. यामुळं निवडणुकीत रंगत आली आहे.मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी आले नाहीत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एमसीएचे मतदार कोण आहेत?

मैदान  क्लब : 211
ऑफिस क्लब : 77
शाळा, महाविद्यालय: 37
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू: 50
एकूण मतदार: 375

मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र

मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे.त्यामुळे त्याचं अध्यक्षपद मिळवणं ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट मानली जाते.  

जंटलमॅन गेम होणे महत्त्वाचे : आशिष शेलार

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे खेळाडू, प्रशिक्षक,  तंत्रज्ञ आणि क्रिकेटसाठी झटणाऱ्या ध्येय वेड्यांंचे एक परिवार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमच्यासाठी हार -जीत महत्त्वाची नाही. हा जंटलमॅन गेम आहे, तो त्याच पध्दतीने होणे महत्त्वाचा आहे. ही खिलाडूवृत्तीने लढलेली मैत्रीपूर्ण लढत होती, ज्यामध्ये अध्यक्ष पदी अजिंक्य नाईक यांचा विजय झाला.  त्यांचे अभिनंदन. आता यापुढे आम्ही सगळे मिळून असोसिएशनसाठी काम करु,  मी त्यांच्या पाठीशी पुर्णपणे उभा आहे. अजिंक्य नाईक यांचा कार्यकाळ यशस्वी होईलच. आम्ही नवनवीन उत्तम खेळाडू तयार व्हावे, त्यांंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकत्रीत कमा करु. आमचे उमेदवार संजय नाईक यांनी सुध्दा खिलाडूपणा दाखवून लढत दिली. आता त्यांना ही मी आवाहन करेन की, आपले हे क्रिकेट परिवार आहे यापुढे सगळ्यांंनी एकत्र काम करु या! असं बीसीसीआयचे खजिनदार आमदार आशिष शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या :

MCA Election: उद्धव ठाकरे, शरद पवारांसह आठवलेंची मतदानाला दांडी, एमसीएच्या अध्यक्षपदासाठी 'दोन नाईकांमध्ये' लढत, कोण बाजी मारणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषदAjit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...Job Majha | DFCCIL मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा? ABP MajhaCM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.