Jhulan Goswami: आगामी इंग्लंड दौरा झुलन गोस्वामीसाठी ठरणार शेवटचा, लॉर्ड्समध्ये खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना
India W Tour Of England: बीसीसीआयच्या (BCCI) सुत्रांकडून याबाबत माहिती मिळत आहे.
![Jhulan Goswami: आगामी इंग्लंड दौरा झुलन गोस्वामीसाठी ठरणार शेवटचा, लॉर्ड्समध्ये खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना India W Tour Of England: Indian Pacer Jhulan Goswami gets farewell game at Lord’s Jhulan Goswami: आगामी इंग्लंड दौरा झुलन गोस्वामीसाठी ठरणार शेवटचा, लॉर्ड्समध्ये खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/09/20075800/1-after-ms-dhoni-tendulkar-now-a-biopic-on-woman-cricketer-jhulan-goswami.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India W Tour Of England: भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याची माहिती समोर आलीय. बीसीसीआयच्या (BCCI) सुत्रांकडून याबाबत माहिती मिळत आहे. दरम्यान, तीन सामन्यांची टी-20 आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. झुलनच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असेल.
दरम्यान, झुलन गोस्वामीची भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन झालंय. इंग्लंड दौऱ्यात ती भारतीय महिला एकदिवसीय संघाच प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. तिनं विश्वचषकात भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. परंतु, एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आगामी इंग्लंड दौरा झुलन गोस्वामीच्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरणार आहे. लॉर्ड्सवर खेळला जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यात झुलन गोस्वामी निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
झुलन ही वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे.
एएनआयचं ट्वीट-
भारतासाठी 200 हून अधिक विकेट्स घेणारी एकमेव गोलंदाज
झुलननं 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिनं तिच्या कारकिर्दीतील पहिला सामना इंग्लंडविरुद्धच खेळला होता. हा सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात तिन सात षटकात 15 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या होत्या. झुलन गोस्वामीनं आतापर्यंत 12 कसोटी, 201 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तिनं कसोटीत 44, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 252 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे.
झुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
क्रिकेट | सामने | डाव | धावा | विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी | सरासरी | इकोनॉमी | स्ट्राईक रेट | 4w | 5w | 10w |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 12 | 21 | 764 | 44 | 5/25 | 17.36 | 2.02 | 51.5 | 2 | 3 | 1 |
एकदिवसीय | 201 | 200 | 5541 | 252 | 6/31 | 21.98 | 3.37 | 39.0 | 7 | 2 | 0 |
टी-20 | 68 | 67 | 1229 | 56 | 5/11 | 21.94 | 5.45 | 24.1 | 0 | 1 | 0 |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)