IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजयासाठी भारत सज्ज, 'या' खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष
India vs South africa T20 : पहिल्या टी20 सामन्यात भारताने 8 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्याने आजचा सामना जिंकून भारत प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर घरच्या मैदानात टी20 मालिकाविजय मिळवू शकतो.
![IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजयासाठी भारत सज्ज, 'या' खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष India vs South africa 2nd T20 match know probable playing 11 india set to win series IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजयासाठी भारत सज्ज, 'या' खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/499c4d5849c2a8d38a399d0f7be41a731664706807952323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs South Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South africa) यांच्यात काही वेळातच दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत प्रथमच घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेवर टी20 मालिकाविजय मिळवू शकतो. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान दिलं गेलं आहे. पण संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने अंतिम 11 मध्ये शक्यतो बदल होणार नाही. अशामध्ये काही खेळाडूंकडून संघाला अधिक अपेक्षा असतील तसंच साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर असतील...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T20 मध्ये भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खेळाकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. दोघेही अव्वल दर्जाचे फलंदाज असल्याने दोघेही फॉर्ममध्ये असल्यास भारत नक्कीच सामना जिंकेल. सूर्यकुमारही चांगल्या फॉर्मात असल्याने त्याच्याकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत युवा गोलंदाज अर्शदीप आण दीपक चाहर कमाल करण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून रिले रोसो, क्विंटन डी कॉक आणि कागिसो रबाडा यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
कशी असू शकते अंतिम 11?
संभाव्य भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर
संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, ट्रिस्टन स्टब्स.
सामन्यावर पावसाचं सावट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)