एक्स्प्लोर

IND vs SA : ईशान किशनचं वादळी अर्धशतक, भारताची 211 धावांपर्यंत मजल

India vs South Africa 1st T20I : ईशान किशन (76) याची वादळी खेळी, त्यानंतर हार्दिक-पंतचा फिनिशिंग टचच्या जोरावर भारतीय संघाना निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या.

India vs South Africa 1st T20I : ईशान किशन (76) याची वादळी खेळी, त्यानंतर हार्दिक-पंतचा फिनिशिंग टचच्या जोरावर भारतीय संघाना निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशनच्या वादळी अर्धशतकीनंतर ऋतुराज गायकवाड आणि श्रेयसची छोटेखानी खेळी तसेच पंत-पांड्याचा फिनिशिंग टच.. या जोरावर भारतीय संघाने धावांचा डोंगर उभा केलाय. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान देण्यात आलेय. 

ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला दमदार सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड 23 धावांवर बाद झाला.. पंत बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी 40 चेंडूत 80 धावांची भागिदारी केली. यामध्ये अय्यरने 15 चेंडूत 28 तर ईशान किशनने 25 चेंडूत 50 धावा चोपल्या. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर लागोपाठ बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव कोलमडतोय असं वाटले. पण हार्दिक पांड्या आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी हाणामारीच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. ईशान किशन 76 तर श्रेयस अय्यर 36 धावांवर बाद झाले. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षठकात धावांचा पाऊस पाडला. पंत 16 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान पंतने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच देत संघाची धावसंख्या 200 पार पोहचवली. हार्दिक पांड्याने 31 धावांची नाबाद खेळी केली. 

ईशानचं वादळी अर्धशतक - 
सलामी फलंदाज ईशान किशन याने पहिल्या टी 20 सामन्यात वादळी खेळी केली. ईशान किशन याने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. ईशान किशन याने आधी ऋतुराजसोबत संघाला दमदार सलामी दिली. त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. ईशान किशनने 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ईशान किशन याने 11 चौकार तीन षटकारांचा पाऊस पाडला. ईशान किशनच्या वादळी खेळीच्या बळावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली. 

हार्दिक-पंतचा फिनिशिंग टच - 
हाणामारीच्या षटकात हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी चौकार आणि षटकार लगावत अखेरच्या षटकात भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. पंत 16 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. पंत आणि हार्दिक पांड्याने 18 चेंडूत 46 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच दिला. हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली. 

एडन मार्करमला कोरोनाची बाधा   - 
 दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेकीवेळी सांगितले की, एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला पहिल्या टी 20 सामन्यातून वगळण्यात आलेय.  मालिकेतील पहिल्या सामन्यातच खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. तसेच या मालिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. दोन्ही संघ तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारत या मालिकेसाठी बीसीसीआयने बायो बबल हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पहिल्याच सामन्याआधी खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे. याबाबत चर्चा सुरु आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget