टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
बीसीसीआयने नवीन जर्सीचा व्हिडिओ एक्स आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नवीन जर्सीबद्दल हरमनप्रीत कौर म्हणाली, 'माझ्या उपस्थितीत नवीन जर्सी लाँच करण्यात आली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
Team India new ODI jersey : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लाँच केली. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही उपस्थित होती. ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी Adidas ने बनवली आहे. टीम इंडियाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या खांद्यावर तीन Adidas पट्टे होते. यावेळी खांद्यावर असलेल्या तीन आदिदास पट्ट्यांना तिरंग्याची छटा देण्यात आली आहे. या जर्सीचा निळा रंग आधीच्या जर्सीपेक्षा किंचित हलका आहे पण त्याच्या बाजूने गडद रंग देण्यात आला आहे. बीसीसीआयने नवीन जर्सीचा व्हिडिओ एक्स आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नवीन जर्सीबद्दल हरमनप्रीत कौर म्हणाली, 'माझ्या उपस्थितीत नवीन जर्सी लाँच करण्यात आली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी त्याच्या लूकवर खूप आनंदी आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध महिला संघ नवी जर्सी घालणार
महिला संघ वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथमच नवीन जर्सी घालणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 15 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार आहेत. 22 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने वडोदरा येथे होणार आहेत. यानंतर संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे 5 डिसेंबर आणि दुसरा 8 डिसेंबरला खेळवला जाईल. हे दोन्ही सामने ब्रिस्बेनमध्ये होणार आहेत. तिसरा सामना 11 डिसेंबरला पर्थमध्ये होणार आहे.
२०२५ मध्येही एकदिवसीय विश्वचषक
2025 मध्ये महिला वनडे विश्वचषकही भारतात होणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल. यामध्ये भारतासह केवळ 8 संघ सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया हा या स्पर्धेचा गतविजेता आहे आणि 7 वेळा विजेतेपद मिळवणारा संघ देखील आहे. भारतीय पुरुष संघ जानेवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा या जर्सीत दिसणार आहे. सुरुवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडिया या जर्सीत दिसणार आहे.
T20 विश्वचषकापूर्वी जर्सी बदलली
वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत दिसली होती. किट प्रायोजक Adidas ने नवीन डिझाइन केलेली ब्लू जर्सी तयार केली होती. ज्यामध्ये केशरी रंगाचे कॉम्बिनेशन होते. त्याच वेळी, व्ही आकाराच्या कॉलरमध्ये तिरंग्याचा रंग होता. Adidas ने लॉन्चिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनाही दाखवण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या