एक्स्प्लोर

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी फक्त केएल राहुल नव्हे...; भारतीय संघाला 5 चुका पडल्या महागात!

India vs New Zealand 1st Test: भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांकडून केएल राहुलला जबाबदार धरण्यात येत आहे.

India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तब्बल 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांकडून केएल राहुलला जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र फक्त केएल राहुलच नव्हे, तर भारतीय संघाला पाच चुका महागात पडल्याचे दिसून आले. 

1- संघात तीन फिरकीपटूंचा समावेश

पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तरीही टीम इंडियाने 3 फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर न्यूझीलंड संघ तीन वेगवान गोलंदाजांसह आला होता. भारताकडे तीन वेगवान गोलंदाज असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

2- नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी-

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा होता, असं स्वत: रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मान्य केले. पावसाळी वातावरण, खेळपट्टी आणि ढगाळ आकाश असतानाही रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले असते तर भारत हा कसोटी सामना जिंकू शकला असता.

3- टीम साउदीला रोखण्यात अपयश-

भारताच्या 46 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडची एकवेळची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा होती. टीम साउदीला 65 धावांची खेळी खेळण्यापासून रोखले असते तर या सामन्याचा निकाल बदलू शकला असता. साउदीने 5 चौकार आणि 4 षटकार टोलावले. टीम इंडियाने साउदीला जास्त धावा करण्यापासून रोखले असते तर न्यूझीलंडची आघाडी 300 धावांपेक्षा जास्त झाली नसती.

4- पहिल्या डावात भारत अवघ्या 46 धावांवर गारद-

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला केएल राहुल एकमेव खेळाडू नव्हता. टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू शून्यावर बाद झाले. अशा परिस्थितीत पराभवासाठी फक्त केएल राहुलला दोष देणे योग्य ठरणार नाही. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही दोन्ही डावात विशेष काही करू शकला नाही.

5- सामना अनिर्णित करण्याचा विचार केला असता तर...

भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज असते आणि कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात सामना अनिर्णित करण्याचा विचार केला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

संबंधित बातमी:

Ind vs NZ: अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मासोबत सलामीला येणार?; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad : निधी द्या हो... जितेंद्र आव्हाडांची हात जोडून नगरविकास विभागाला विनंतीUdayanraje Bhosale PC| महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदा पास करा-उदयनराजे भोसलेPrakash Mahajan On Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झालीयEkanth Shinde Vidhan Parishad | तो हिंमत आपकी बोलने की ना होती..एकनाथ शिंदेंचं संपूर्ण भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
Embed widget