टी-20 विश्वचषकात आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
IND vs NZ Womens T20 World Cup 2024: टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही या स्पर्धेतील पहिला सामना असेल.
IND vs NZ Womens T20 World Cup 2024: आज महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. विश्वचषकातील भारतीय संघाचा हा पहिला सामना असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करुन स्पर्धेत विजयाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि न्यूझीलंडचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना असेल. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही या स्पर्धेतील पहिला सामना असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल.
सामना कधी आणि कुठे होणार?
महिला टी-20 विश्वचषक 2024 मधील (Womens T20 World Cup 2024) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शुक्रवार, 04 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय चाहत्यांना संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना थेट पाहता येणार आहे.
सामना कुठे बघाता येईल?
भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील सामना स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया-
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, एस सज्जना, एस. शोभना.
महिला टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ-
सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (सी), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (wk), हन्ना रो, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर.
भारताचे सामने-
4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका
12 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
गटवारी-
Group A: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर संघ-1
Group B: दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ-2
किती संघ सहभागी होणार?
महिला टी-20 विश्वचषकाची स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून त्यांच्यामध्ये अंतिम फेरीसह 23 सामने खेळवले जाणार आहेत. या 10 संघांची प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताबाबत बोलायचे झाले तर त्याचा समावेश अ गटात करण्यात आला असून त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना दुसऱ्या गटात ठेवण्यात आले आहे.