एक्स्प्लोर

Hardik Pandya: न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून 2024च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात- हार्दिक पांड्या

IND vs NZ: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अपयशानंतर भारताचा युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुलसह (KL Rahul) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय.

IND vs NZ: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अपयशानंतर भारताचा युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुलसह (KL Rahul) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. तर, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर टी-20 संघाचा जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द करण्यात आलाय. दरम्यान, भारताच्या टी-20 संघाच नेतृत्व मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या सतत बोलताना दिसत आहे. भारतानं टी-20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीला मागं सोडलंय आणि आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीनं तयारीला सुरुवात केलीय. 

आगामी टी-20 विश्वचषक जवळपास दोन वर्षानंतर खेळला जाणार आहे. या कालावधीत युवा खेळाडूंकडं आपली क्षमता सिद्ध करण्याचा भरपूर वेळा. 2024 च्या विश्वचषकापूर्वी भारताला बरंच क्रिकेट खेळायचंय आणि बहुतेक लोकांना संधी मिळतील. टी-20 विश्वचषकाचा रोड मॅप आजपासून म्हणजेच न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून सुरू झालाय. तूर्तास एवढंच ठरवायचं आहे की, संघातील खेळाडूंनी इथं खेळण्याचा आनंद घ्यावा. भविष्याबद्दल आपण नंतर बोलू."

हार्दिक पांड्या टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनण्याची शक्यता
ताज्या माहितीनुसार, लवकरच हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनवलं जाऊ शकतं. बीसीसीआयनं सध्या रोहित शर्माला हटवण्याचं ठरवलं असून त्याच्या जागी हार्दिक पांड्याला जबाबदारी दिली जाऊ शकते. न्यूझीलंड दौऱ्यानंतर हार्दिक पांड्याकडं अधिकृतपणे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांनी हार्दिकला पाठिंबा दर्शवलाय. हार्दिकनं इंडियन प्रीमियर लीगमध्येही कर्णधारपदाचं कौशल्य दाखवलंय. पदार्पणाच्या हंगामातच त्यानं गुजरात टायटन्सच्या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. रोहित शर्माकडं एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार कायम असेल. मात्र, 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना आज 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाणार होता. पण हा सामना पावसामुळं रद्द झाला. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
Embed widget