IND vs NZ 1st Test Day 1: कसोटी पदार्पणात श्रेयस अय्यरचं अर्धशतकं, भारताचा स्कोर 200 पार
IND vs NZ 1st Test Day 1: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळला जातोय.
IND vs NZ 1st Test Day 1: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतानं आतापर्यंत चार फलंदाज गमावले आहेत. मयंक अग्रवाल (13), शुभमन गिल (52) आणि अजिंक्य राहाणे (35) यांना काईल जॅमसननं माघारी धाडलंय. तर, टीम साऊथीच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराही (26) झेल बाद झालाय. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या श्रेयस अय्यरनं अर्धशतक करून भारताचा डाव सावरलाय. श्रेयस अय्यर सध्या मैदानात उपस्थित असून भारताला मोठ्या धाव संख्याकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तर, दुसऱ्या बाजूला अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाही संयमी खेळी करत त्याला साथ देतोय.
श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचदरम्यान, श्रेयस अय्यर कसोटीमध्ये पदापर्ण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर त्याला मार्चमध्ये विराट कोहलीच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार होतं. परंतु अजिंक्य रहाणे अतिरिक्त गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. श्रेयस अय्यरला पहिली कसोटी खेळण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्या मालिकेपूर्वी अय्यरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद द्विशतक झळकावलं होतं.
भारतीय संघ-
शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव
न्यूझीलंड संघ-
टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम सोमरविले
भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू या कसोटीला अनुपस्थित आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघातील टी-20 मालिकेतून बाहेर असलेला कर्णधार केन विल्यमसनने या कसोटीत पुनरागमन केलंय. त्याच्या पुनरागमनामुळं न्यूझीलंडच्या संघाची फलंदाजी मजबूत होईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha