एक्स्प्लोर

IND vs NZ Head to Head : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मध्ये चुरशीची टक्कर, कसा आहे आजवरचा इतिहास?

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान या सामन्यांपूर्वी दोघांचा आजवरचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे पाहूया...

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होत आहे. पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (JSCA Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेऊ शकतो आणि मालिकेतील पुढील सामन्यात अधिक चांगली कामगिरी करु शकेल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...

आजवरच्या इतिहासाचा विचार करता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये जवळपास बरोबरीची स्पर्धा झाली आहे. येथे भारताने 12 सामने जिंकले असून न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. या सामन्यांचे निकाल पाहता येथे टीम इंडियाचा काहीसा वरचष्मा दिसत असला तरी आज एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळू शकतो. दरम्यान न्यूझीलंडचा संघ गेल्या 11 वर्षांपासून भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे. 2012 मध्ये किवींनी शेवटची टी20 मालिका भारतीय भूमीवर जिंकली होती. न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायला आला, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2017 मध्ये न्यूझीलंडने भारतीय भूमीवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने 2-1 ने जिंकली. आणि 2021 च्या मालिकेत टीम इंडियाने किवींचा 3-0 असा पराभव केला होता. ज्यामुळे आजही भारत सामना जिंकल अशी आशा चाहत्यांना आहे.

कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर -शुभमन गिल, ईशान किशन

मिडिल ऑर्डर फलंदाज - सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा

ऑलराउंडर- हार्दिक पांड्या (कर्णधार),  दीपक हुडा, 

गोलंदाज - कुलदीप यादव, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती  पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंदCM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेतABP Majha Headlines : 04 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRahul Shewale on Lok Sabha Elections : मुंबईत पाचव्या टप्प्याचं मतदान, राहुल शेवाळे देवदर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Chhagan Bhujbal : 'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
Suhas Palshikar on Majha Katta: भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
Sangli News : सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
Embed widget