एक्स्प्लोर

India vs Ireland : मिशन आयर्लंड, बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ रवाना, बीसीसीआयने पोस्ट केले फोटो

India Tour Of Ireland 2023 : तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयर्लंडला रवाना झालाय.

India Tour Of Ireland 2023 : तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयर्लंडला रवाना झालाय. बीसीसीआयने संघाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अनेक दिवसानंतर जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करत आहे. चाहते बुमराह याला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतील. मॅचविनर जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.  18 ऑगस्ट रोजी पहिला सामना होणार आहे.   

View this post on Instagram
 
A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

युवा खेळाडूंना संधी - 

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कसा आहे ?

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान. 

आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -

भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना होणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना होणार आहे. 

राहुल-अय्यरची प्रतीक्षाच - 

आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंचं दुखापतीनंतर पुनरागमन होत आहे. पण दोन महत्वाच्या खेळाडूंची अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. त्यामुळे केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया चषक आणि वर्ल्डकपसाठी उपलब्ध असतील की नाही, याबाबत बीसीसीआयकडून सध्या कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

सिनिअर खेळाडूंना आराम -
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget