Rohit Sharma Records: 'हिटमॅन' 'या' विक्रमापासून फक्त एक षटकार दूर!
Rohit Sharma Records: भारताच्या सलामी फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 423 षटकार ठोकले आहेत. त्यापैकी रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 99 षटकार ठोकले आहेत.
Ind vs Aus: भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा तिसरा कसोटी सामना गुरूवारपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्यासाठी तयार आहे. सिडनी येथे खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. IPL संपल्यापासून सुमारे तीन महिने रोहित क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या महिन्यात बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीकडून फिटनेस क्लियरन्स मिळाल्यानंतर रोहित टीम इंडियामध्ये दाखल झाला आहे. या सामन्यात रोहितच्या खेळीकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबईकर जोडी संघाचं नेतृत्व करणार आहे. अजिंक्य रहाणे संघाचा कर्णधार तर रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे तिसरा कसोटी सामना खेळला तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रम नोंदवू शकतो.
India vs Australia, 3rd Test | दोन्ही संघात होणार मोठे बदल, 'या' स्टार खेळाडूंवर सर्वांची नजर
भारताच्या सलामी फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 423 षटकार ठोकले आहेत. त्यापैकी रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 99 षटकार ठोकले आहेत. जर रोहित शर्माने सिडनीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात आणखी एक षटकार ठोकला तर रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू असेल. यापूर्वीच रोहितच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार केल्याचा विक्रम आहे. इंग्लंडचा इयन मॉर्गन 63 षटकारांसह दुसर्या स्थानावर आहे.
दरम्यान बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांने 1-1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत कोणताही संघ तिसरी कसोटी जिंकणे पसंत करेल. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरीला कायम ठेवावं लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला संघ दुसर्या कसोटीतील पराभवाला मागे सारून तिसरी कसोटी कशी जिंकता येईल याकडे पाहावे लागणार आहे. तथापि, तिसर्या कसोटीसाठी संघ निवडणे ही दोन्ही संघांची सर्वात मोठी चिंतेची बाब असणार आहे.
KL Rahul Ruled Out | केएल राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या उर्वरित दोन कसोटीमधून बाहेर