Asian Games 2023 : पुरुष क्रिकेट संघाला सुवर्णपदक, अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात भारताचा विजय; भारताच्या खात्यात 103 पदकं
India vs Afghanistan Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
IND vs AFG, Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) पुरुष क्रिकेट संघानं (Team India) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील सुवर्णपदकाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने सुवर्णपदक पटकावलं आहे. आशियाई स्पर्धा 2023 मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना हांगझोऊमध्ये सुरु होता. मात्र, सामन्यात अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना मधेच थांबवावा लागला. हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा सामना सुरु असण्याची शक्यता फार कमी असल्याने पॉईंट्स टेबलनुसार, भारताला सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं आहे.
पुरुष क्रिकेट संघानं सुवर्णपदक
आशियाई स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारताने पॉईंट्स टेबलवरी उच्च रँकिंगमुळे सुवर्णपदक जिंकलं आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धांबाबत हा क्लीन स्वीप आहे. दरम्यान, अफगाणिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. आजच्या सामन्यावर पावसाचं सावट होतं. आशियाई खेळांच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाला, तर उच्च रँकिंग संघाला विजेता घोषित केलं जातं. या नियमानुसार, भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे असल्यामुळे भारताला सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं आहे.
India bag GOLD after match gets abandoned due to rain 🏏
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2023
The #MenInBlue triumph against 🇦🇫 as higher ranked opponents to clinch the #Gold🥇
Three cheers for team 🇮🇳🥳
Well done guys! #AsianGames2022#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/m6gzwO4XTY
Asian Games 2022. No Result - India Wins🥇https://t.co/dD03qLZ93z #INDvAFG #IndiaAtAG22
— BCCI (@BCCI) October 7, 2023
सात्विक-चिराग जोडीला बॅडमिंटमध्ये 'गोल्ड'
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. सात्विक-चिरागच्या जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं.
🇮🇳's Historic Gold in Badminton 🥇🏸@satwiksairaj and @Shettychirag04 soar to victory in the Badminton Men's Doubles finals, clinching the coveted Gold Medal for the 1️⃣st time ever in the Asian Games history🏆🇮🇳
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2023
Their incredible teamwork and unwavering spirit have made India… pic.twitter.com/iRqNLRHTs2
भारताच्या आतापर्यंत 28 सुवर्णपदकांसह 103 पदकं
भारताने यंदा आशियाई खेळांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 72 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने आशियाई खेळांमध्ये 100 चा आकडा पार केला आहे. आतापर्यंत आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताच्या खात्यात 28 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. यासोबतच भारताने यंदा 103 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 28 सुवर्णपदकं, 35 रौप्यपदकं, 40 कांस्यपदकांचा समावेश आहे.