Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माची मुंबईतील लढाई सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचली? खरं काय अन् खोटं काय??
पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबईत आणण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर वाद वाढला गेला. आता असा दावा केला जात आहे की रोहित आणि हार्दिकने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे.
Mumbai Indians IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने संघात अनेक बदल केले आहेत. रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबईत आणण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर वाद वाढला गेला. आता असा दावा केला जात आहे की रोहित आणि हार्दिकने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, हार्दिक आणि रोहितने इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले आहे. या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही दोघांचे प्रोफाइल तपासले. रोहित आणि हार्दिक एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत, पण हे दोघेही आधी एकमेकांना फॉलो करत होते की नाही हे माहीत नाही. एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रितिका सजदेह आणि पांड्याचे प्रोफाईल शेअर करण्यात आले आहेत. त्यानुसार हे दोघेही पूर्वी एकमेकांना फॉलो करत होते, पण आता अनफॉलो केलं आहे.
View this post on Instagram
रोहित दीर्घकाळ मुंबईचा कर्णधार राहिला आणि त्याने संघाला विजेतेपदापर्यंत नेले. आता संघ व्यवस्थापनाने पांड्याला त्याची जागा दिली आहे. यापूर्वी हार्दिक गुजरात टायटन्सकडून खेळत होता आणि कर्णधारही होता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने चमकदार कामगिरी केली. या संघाने एकदा आयपीएलचे विजेतेपदही पटकावले होते. हार्दिकची वैयक्तिक कामगिरीही चांगली झाली आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. या कालावधीत 2309 धावा केल्या आहेत. यासह 53 विकेट्स घेतल्या आहेत.
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो आतापर्यंत IPL मध्ये 243 सामने खेळला आहे. या कालावधीत 6211 धावा केल्या आहेत. रोहितने एक शतक आणि 42 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 109 धावा आहे. गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवली आहे. रोहितने आयपीएलमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या